मुंबई | भारतीय संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान सहा हा अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यास मुकणार आहे. तो आयपीएल २०१८च्या अंतिम सामन्यापुर्वी झालेल्या दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे.
यापुर्वीच कर्णधार विराट कोहलीने या मालिकेतुन माघार घेतली आहे. तो या काळात सरेकडून काऊंटी क्रिकेट खेळणार आहे. यामुळे भारतीय कसोटी संघात जे खेळाडू नियमीत खेळतात त्यातील दोन मोठे खेळाडू या मालिकेत खेळणार नाही.
वृद्धिमान सहाच्या हाताला प्ले-आॅफ सामन्यादरम्यान दुखापत झाली आहे. तेव्हा त्याला शुभम मावीचा एक चेंडू हाताला लागला होता. त्याला ६ आठवड्यांची विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे तो या मालिकेत भाग घेणार नाही. तो थेट इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसेल. ती मालिका १ आॅगस्ट रोजी सुरु होणार आहे.
अशी आहे टीम इंडिया- अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, शार्दल ठाकुर
#TeamIndia for one-off Test against Afghanistan announced
Ajinkya (Capt), Shikhar, Vijay, KL Rahul, Pujara, Karun Nair, Saha (wk), Ashwin, Jadeja, Kuldeep, Umesh, Shami, Hardik, Ishant, Shardul #INDvAFG
— BCCI (@BCCI) May 8, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-तो स्क्रिनशाॅट पाहिल्यावर नक्की काय करावे सुचत नव्हते- राशिद खान
–ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज
–चेतेश्वर पुजाराने इंग्लंड गाजवले, वनडेत पुन्हा एक तुफानी फटकेबाजी
–त्याची आयपीएलमधील एक विकेट गेली ३० लाख रुपयांना!
-विजेतेपदामुळे धोनीचा चाहत्यांकडून दुर्लक्षित झालेला क्रिकेट इतिहासातील मोठा विक्रम!
–संपुर्ण यादी- आयपीएल २०१८मध्ये या खेळाडूंना मिळाले अॅवार्ड्स
–आयपीएलच्या इतिहासातील ही आहे सर्वात वेगळी आकडेवारी
–चेन्नई सुपर किंग्जचा हा इतिहास तुम्हाला नक्कीच माहित नसेल!
–चेन्नई सुपर किंगमधील खरा ‘किंग’ धोनीच आहे, जाणुन घ्या काय आहे कारण
-धोनी ते वाक्य बोलला आणि चेन्नईच्या चाहत्यांच्या डोळ्यात आले पाणी !
–धोनीबद्दल रैना जे बोलला ते खरे करुन दाखवले!
–सलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू
–म्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन