भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात शुक्रवारी (११ डिसेंबर) सिडनी येथे सराव सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय संघाने कमालीचे क्षेत्ररक्षण केले. दरम्यान यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने ऑस्ट्रेलियन फलंदाज निक मॅडिसनचा दमदार झेल पकडला. साहाच्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
असा पकडला साहाने झेल
झाले असे की, या सराव सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ५० षटकांच्या आतच १९४ धावांवर भारतीय संघाला सर्वबाद केले. भारतीय संघाच्या या आव्हानाचा पाठलाग करताना १३ षटकांच्या आतच ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने ३ विकेट्स गमावल्या. मात्र ऑस्ट्रेलियन फलंदाज निक मॅडिसन आणि यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरी मिळून संघाचा डाव पुढे नेत होते.
अशात भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज डावातील १६वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मॅडीसनने मिड विकेटकडे जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, साहाने वेगाने चेंडूचा पाठलाग करत दोन्ही हातांनी अशक्य वाटणारा झेल पकडला. त्याच्या या अप्रतिम झेलमुळे मॅडिसन ३४ चेंडूत १९ धावा करत पव्हेलियनला परतला.
WHAT. A. CATCH! 👌👌 @Wriddhipops is excellent behind the stumps and equally good in the outfield. #TeamIndia
📷 – Getty Images Australia pic.twitter.com/j7J7fFVCnn
— BCCI (@BCCI) December 11, 2020
That's Saha at mid wicket!
What a catch by the keeper 👏
Watch #AUSAvIND live: https://t.co/7h4rdQDzHV pic.twitter.com/8Msx6nIqlS
— cricket.com.au (@cricketcomau) December 11, 2020
असा होता भारतीय संघाचा डाव
सिडनी येथे चालू असलेल्या सराव सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाला १९५ धावांचे आव्हान दिले. यात जसप्रीत बुमराहच्या सर्वाधिक नाबाद ५५ धावांचा समावेश आहे. बुमराहव्यतिरिक्त केवळ २ भारतीय फलंदाज ४० पेक्षा जास्त धावा करु शकले. यात युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ ( २९ चेंडूत ४० धावा) आणि शुभमन गिल (५८ चेंडूत ४३ धावा) यांचा समावेश आहे.
त्यांच्याव्यतिरिक्त इतर भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. मयंक अगरवाल, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांसारखे फलंदाज २०पेक्षा जास्त धावा करु शकले नाहीत.
संबंधित बातम्या –
बुमराहने कमालच केली! अर्धशतक ठोकल्यानंतर मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’, Video जोरदार व्हायरल
INDvsAUS: दुसऱ्या सराव सामन्यात विराट- पुजारा यांच्या अनुपस्थितीमुळे भारताची अवस्था ‘दयनीय’
भारतीय संघासाठी खुशखबर! रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाण्यास सज्ज