---Advertisement---

भारतीय संघातील जागा गमावलेला ‘हा’ यष्टीरक्षक आता मेंटॉर म्हणून सुरू करतोय नवी इनिंग

On: शनिवार, जुलै 9, 2022 11:30 PM
Wriddhiman-Saha-Abhimanyu-Eshwaran
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या खूप स्पर्धा असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक खेळाडूंना वेळोवेळी चांगले प्रदर्शन करुन सुद्धा संघात स्थान मिळत नाही. अशाच खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाचे नाव येते. वय जास्त होत असल्याने भारतीय संघात त्याला स्थान मिळणार नाही असेही त्याला सांगण्यात आले होते. त्यामुळेच त्याला स्थानिक क्रिकेटच खेळावे लागत आहे.

वृद्धीमान साहा आता त्रिपुरासाठी खेळताना दिसेल. मागच्या महिन्याच्या अखेरीस त्याने बंगाल क्रिकेटकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेतले. तर आता तो त्रिपुरा संघाचा केवळ सदस्य म्हणुन नव्हे तर संघाचा मेंटॉर म्हणुनही काम करेन. तसेच त्याच्याकडे संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यामुळेच सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या कॅंपमध्ये तो सहभागी होण्यासाठी सज्ज असेल.

(ही बातमी ६० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---