---Advertisement---

WTC Final : हर्षा भोगलेंनी निवडली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन, 8व्या स्थानासाठी ठेवले दोन पर्याय

On: शनिवार, जून 3, 2023 11:52 AM
Team-India
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा संपली आहे आणि आता क्रिकेटप्रेमी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्याची वाट पाहत आहेत. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने येणार आहेत. हा सामना लंडनच्या के ओव्हल मैदानावर 7 ते 11 जूनदरम्यान पार पडणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला पोहोचला आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच समालोचक हर्षा भोगले यांनी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.

शुबमन आणि रोहित करणार डावाची सुरुवात
हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी त्यांच्या आवडत्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा ट्विटरवरून केली आहे. त्यांनी डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांची निवड केली आहे. तसेच, तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाच्या रूपात चेतेश्वर पुजारा याला संधी दिली आहे. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानावर विराट कोहली (Virat Kohli) याची निवड केली आहे, जो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तसेच, पाचव्या स्थानावर त्यांनी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याला निवडले आहे.

कोण असेल भारतीय संघाचा यष्टीरक्षक?
भारतीय संघासाठी सर्वात मोठी निवड ही यष्टीरक्षकाचे असेल. यामध्ये ईशान किशन (Ishan Kishan) आणि केएस भरत (KS Bharat) असे दोन पर्याय आहेत. अशात समालोचक हर्षा भोगले (Commentator Harsha Bhogle) यांनी केएस भरत याच्यापेक्षा जास्त महत्त्व ईशान किशन याला दिले आहे.

समालोचक हर्षा भोगले यांच्या मते, सातव्या स्थानी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) असेल. तसेच, आठव्या क्रमांकावर त्यांनी दोन पर्याय दिले आहेत. त्यात आर अश्विन (R Ashwin) ही त्याची पहिली पसंत आहे आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हादेखील या स्थानावर फिट बसतो. तसेच, नवव्या स्थानावर त्यांच्यानुसार, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्यापैकी एकाला स्थान मिळेल. याव्यतिरिक्त संघात मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचाही समावेश असेल.

हर्षा भोगले यांची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर / आर अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमेश यादव / जयदेव उनादकट (wtc final 2023 harsha bhogle picks team india best playing 11 this 2 player also part of team)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शुबमन गिल आता प्रिन्स नाही…’, मोठे कारण देत भारतीय दिग्गजाने वेधले क्रिकेटविश्वाचे लक्ष्य
‘मी भारताचा निवडकर्ता असतो तर…’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे किशन-भरतविषयी मोठे भाष्य, वाचा काय म्हणाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---