---Advertisement---

WTC Final मधील सर्वात भारी क्षण, भज्जीने दिला पाकिस्तानच्या चिमुकल्या चाहत्याला ऑटोग्राफ; Video Viral

Harbhajan-Singh
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याचे फक्त भारतातच नाही, तर जगभरात चाहते आहेत. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या अनेक सामन्यात त्याच्यात आणि फलंदाजांमध्ये अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. असे असूनही त्याने पाकिस्तानमध्येही अनेक चाहते कमावले आहेत. हरभजन सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यादरम्यान समालोचन करताना दिसत आहे. यादरम्यान त्याने पाकिस्तानी चाहत्याला ऑटोग्राफ देऊन क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.

हरभजनने व्हीलचेअरवर बसलेल्या विशेष मुलाला दिला ऑटोग्राफ
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात सुरू असलेल्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी हजेरी लावली आहे. यादरम्यान एक शानदार नजारा पाहायला मिळाला. हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने व्हीलचेअरवर बसलेल्या एका विशेष मुलाला ऑटोग्राफ दिला. एका ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला कॅप्शन देत असे लिहिण्यात आले आहे की, “इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हरभजनने दिलेला आदर.”

भज्जीने गिल आणि विराटच्या फॉर्मविषयी केला विश्वास व्यक्त
यादरम्यान ‘भज्जी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या हरभजनने शुबमन गिल (Shubman Gill) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या चांगल्या फॉर्मविषयी विश्वास व्यक्त केला. तो म्हणाला की, “हे भारतासाठी चांगले संकेत आहेत. कदाचित इंग्लंडमध्ये फलंदाजी करण्यासाठी सर्वोत्तम खेळपट्टी आहे. जसजसा खेळ पुढे जाईल, फलंदाजी करणे चांगले होईल. मला वाटत नाही की, भारताला या खेळपट्टीवर फलंदाजी करण्यात कोणतीही समस्या येईल. गिल आणि विराट चांग्लया फॉर्ममध्ये आहेत.”

गिल आणि विराट तंबूत
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत 469 धावा चोपल्या. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला 19 षटकांमध्येच 4 झटके बसले. त्यात रोहित शर्मा (15), शुबमन गिल (13), चेतेश्वर पुजारा (14), विराट कोहली (14) या खेळाडूंचा समावेश होता. भज्जीचा विश्वास गिल आणि विराट सार्थ ठरवू शकले नाहीत. (wtc final 2023 ind vs aus former cricketer harbhajan singh gave autograph to little pakistani fan see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आनंदवार्ता! बेअरस्टोच्या गर्लफ्रेंडच्या पोटी बाळाने घेतला जन्म, इंस्टावरून स्वत: दिली माहिती
रोहितने रिव्ह्यूची उडवली खिल्ली, पंचांना गोंधळात टाकण्यासाठी केले ‘हे’ कृत्य; लगेच पाहा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---