जागतीक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा दारून पराभव झाला. अंतिम सामन्यात भारताला बलाढ्य ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी पराभूत केले. अंतिम सामन्यात येऊन पराभूत होण्याची भारताची ही पहिलीच वेळ नाहीये. मागच्या 10 वर्षांमध्ये असे अनेकदा झाले आहे की, संघ विजेतेपदाच्या अगदी जवळ येऊन पराभूत झाला आहे. रविवारी (12 जून) भारताला मिळालेल्या पराभवाची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. पण माजी दिग्गज गौतम गंभीर याने एक अनोखे कारण सांगितले, ज्यामुळे संघाचे एकंदरीत प्रदर्शन बिघडले आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), एमएस धोनी (MS Dhoni), विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) अशा खेळाडूंना इतर खेळाडूंपेक्षा जास्त महत्व मिळाले आहे. माध्यमांमध्येही काही मोजक्याच खेळाडूंना महत्व दिले गेले आहे. असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांनी भारतीय संघासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. पण त्यांना चाहते आणि माध्यमांकडून अपेक्षित महत्व आणि प्रसिद्धी मिळाली नाही. गौतम गंभीर (Gautam Gambhir) देखील अशाच खेळाडूंपैकी एक मानला जातो, ज्यांना अपेक्षित महत्व मिळाले नाही. गंभीरने अनेकदा ही गोष्ट बोलून दाखवली आहे की, 2011 विश्वचषक एकट्या एमएस धोनीने जिंकला नसून त्यासाठी संपूर्ण संघाचे योगदान राहिले आहे. आता डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात पराभव मिळाल्यानंतर देखील गंभीरने पुन्हा एकदा हाच मुद्दा बोलून दाखवला.
एका माध्याला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीर म्हणाला, “शक्यतो हे कोणी बोलणार नाही, पण मी बोलत आहे. कारण सत्य समोर आले पाहिजे. आपल्या देशात संघा प्रति तेवढे प्रेम दिसत नाही, जितके एखाद्या खास खेळाडूविषयी पाहायला मिळते. आपण एखाद्या खेळाडूला संघापेक्षा जास्त मोठे समजतो. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळाडूंपेक्षा संघाला मोठे मानले जाते. पण भारतात मात्र तसे नाहीये. भारतीय क्रिकेटमध्ये जे स्टेक होल्डर्स आहेत, ते सर्वजण केवळ पीआर एजंसी बनले आहेत. फक्त तीन लोकांनाच दिवसभर दाखवले जाते. आपण वैयक्तिक प्रदर्शनाला अधिक महत्व देत असल्यामुळे संघ मोठ्या काळापासून आयसीसीचे विजेतेपद जिंकू शकला नाहीये.”
दरम्यान, गौतम गंभीर आणि विराट कोहली इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये एकमेकांशी भिडले होते. दोघांतील हा वाद अनेक दिवस चर्चेत राहिला. अशातच रविवारी माध्यमांवर बोलताना गंभीरने विराटचे कौतुक केल्याचेही पाहायला मिळाले. “विराटने भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानामुळे माझ्या मनात त्याच्यासाठी आदर आहे,” असे गंभीर म्हणाला. (Gautam Gambhir indirectly targets MS Dhoni)
महत्वाच्या बातम्या –
‘भारतीय फलंदाजांना बाबर आझमकडून शिकण्याची गरज…’, पराभवानंतर माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान
आयपीएलमधील 3 स्टार्सचे नशीब फळफळले! दुलीप ट्रॉफी स्पर्धेत एकाकडे कॅप्टन्सी, तर दोघांना संघात एन्ट्री