भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला, पण त्यांना किताब जिंकता आला नाही. ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी पराभूत केले. या सामन्यासाठी भारताने दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला नव्हता. त्यामुळे भारतावर अनेक दिग्गजांपासून ते चाहत्यांपर्यंत टीकास्त डागले. आता यामध्ये दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांचाही समावेश झाला आहे. गावसकरांनी त्यांच्या वक्तव्याने 140 कोटी भारतीयांना विचार करायला भाग पाडले आहे. त्यांनी म्हटले की, भारताच्या इतर कोणत्याच टॉप क्रिकेटपटूला अशी वागणूक मिळाली नाही, जशी फिरकीपटू अश्विनला मिळाली आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत जगातील अव्वल क्रमांकाचा कसोटी गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले नव्हते. सुनील गावसकर यांच्यासह अनेकांनी लंडनच्या के ओव्हल मैदानावरील भारताच्या पराभवामागे अश्विन संघात नसण्याचे कारण सांगितले. अश्विनला अंतिम सामन्याबाहेर ठेवण्याचा निर्णय भारत आणि ऑस्ट्रेलियाचे अनेक क्रिकेटपटू चुकीचे म्हटले होते.
गावसकर काय म्हणाले?
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी एका नामांकित वृत्तपत्राच्या कॉलममध्ये लिहिले की, “आधुनिक युगात कोणत्याही इतर अव्वल श्रेणीच्या भारतीय क्रिकेटपटूला अश्विनसारखी वागणूक दिली गेली नाहीये. भारताने कसोटी क्रिकेटमध्ये जगातील अव्वल क्रमांकाच्या एका गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली नाही. तसेच, ऑस्ट्रेलियन संघात पाच डाव्या हाताचे फलंदाज होते आणि त्यांनीच ऑस्ट्रेलियाला विजयी केले. पहिल्या डावात ट्रेविस हेड याचे शतक आणि दुसऱ्या डावात ऍलेक्स हेल्स आणि मिचेल स्टार्कची खेळी. सर्वांना माहितीये की, अश्विन डाव्या हाताच्या फलंदाजांना लवकर बाद करतो.”
त्यांनी पुढे लिहिले की, “जर अश्विन संघात असता, तर कुणाला माहिती काय झाले असते. तो बॅटमधूनही योगदान देऊ शकत होता. तुम्हीच सांगा, जर आयसीसी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला फलंदाज भारतीय संघात असता आणि त्याला फक्त यासाठी बाहेर केले असते की, त्याने हिरव्या खेळपट्टीवर किंवा फिरकीपटूंना फायदेशीर खेळपट्टीवर धावा केल्या नाहीत? विश्वासाने सांगतो, असे होत नाही.”
अश्विनची कारकीर्द
अश्विनच्या कारकीर्दीवर नजर टाकायची झाली, तर त्याने 92 कसोटी सामने खेळताना 23.93च्या सरासरीने 474 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने 32 वेळा एका टावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. ही आकडेवारी दुर्लक्षित करून त्याला डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातून बाहेर ठेवले. यापूर्वी इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेदरम्यानही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नव्हती. (wtc final 2023 no one has been treated like r ashwin sunil gavaskar made big statement)
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या कॅप्टन्सी वादावर स्पष्टच बोलला गांगुली; म्हणाला, ‘बीसीसीआयने काढलंच नव्हतं, त्याने स्वत:च…’
कसोटी इतिहासातील 5 सर्वात यशस्वी कर्णधार, यादीत विराट एकटाच भारतीय; सर्वाधिक विजयी टक्केवारी ‘या’ संघाची