---Advertisement---

कसोटी इतिहासातील 5 सर्वात यशस्वी कर्णधार, यादीत विराट एकटाच भारतीय; सर्वाधिक विजयी टक्केवारी ‘या’ संघाची

On: मंगळवार, जून 13, 2023 11:50 AM
Virat-Kohli-And-Ricky-Ponting
---Advertisement---

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वात कठीण प्रकार म्हणून कसोटी क्रिकेटला ओळखले जाते. कारण, या क्रिकेट प्रकारात खेळाडूंचा चांगलाच कस लागतो. कोणत्याही खेळाडूच्या तंत्रापासून त्याच्या धैर्यापर्यंत सर्वांची परीक्षा कसोटी क्रिकेट घेतो. कोणत्याही संघासाठी या क्रिकेट प्रकारात यशस्वी होण्यासाठी गोलंदाजी आणि फलंदाजी विभागात सर्वोत्तम खेळाडू असावे लागतात. ज्या संघात हे संतुलन चांगले असते, त्या संघासाठी विजय मिळवणे म्हणजे सोपी गोष्ट असते. मात्र, यामध्ये कर्णधाराची भूमिकाही सर्वात महत्त्वाची असते.

कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक सत्रानंतर सामना पलटताना पाहायला मिळते. अशात कोणत्याही संघाच्या कर्णधाराची भूमिका महत्त्वाची ठरते. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी त्या-त्या वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात. आज आम्ही तुम्हाला कसोटी इतिहासातील अशा 5 कर्णधारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या नेतृत्वात संघ सर्वाधिक यशस्वी राहिले आहेत.

5. ग्रीम स्मिथ (विजयी टक्केवारी- 48.62)
सन 2003 ते 2014पर्यंत दक्षिण आफ्रिका संघाचा कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा पाहायला मिळाला होता. याचे सर्वात मोठे कारण ग्रीम स्मिथ (Graeme Smith) होते. त्याच्या नेतृत्वात संघाने जागतिक क्रिकेट गाजवले होते. स्मिथची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्येही कसोटी मालिका जिंकली होती. स्मिथच्या नेतृत्वात संघाने 109 कसोटी सामने खेळले, ज्यापैकी त्याने 53 सामने जिंकले आणि संघाची विजयी टक्केवारी 46.82 राहिली होती.

4. क्लाईव्ह लॉयड (विजयी टक्केवारी- 48.64)
वेस्ट इंडिज संघाने जागतिक क्रिकेटमध्ये 1974 ते 1985 अशी 11 वर्षे दबदबा राखला. त्यावेळी वेस्ट इंडिज संघाची गणना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात खतरनाक संघांमध्ये केली जायची. विंडीजचे नेतृत्व त्यावेळी क्लाईव्ह लॉयड (Clive Llyod) यांच्याकडे होते. त्यांच्या नेतृत्वात संघाने भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. लॉयड यांच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजने 74 कसोटी सामन्यांपैकी 36 सामन्यात विजय मिळवला होता. लॉयड यांच्या नेतृत्वाच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात विंडीज संघाने फक्त 3 कसोटी मालिका गमावल्या होत्या.

3. विराट कोहली (विजयी टक्केवारी- 58.82)
भारतीय संघाने 2014 ते 2022दरम्यान विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेट प्रकारात सानदार कामगिरी केली होती. सन 2015मध्ये श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाने 3 सामन्यांची कसोटी मालिका 2-1ने आपल्या नावावर केली होती. यानंतर सन 2018-19दरम्यान विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ आशियातील पहिला संघ बनला होता, ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला होता. विराटच्या नेतृत्वात भारताने एकूण 68 कसोटी सामने खेळले होते. त्यापैकी 40 सामने जिंकण्यात भारताला यश आले होते. यादरम्यान संघाच्या विजयाची टक्केवारी 58.82 पाहायला मिळाली होती. महत्त्वाचं म्हणजे, विराटने जानेवारी 2022मध्ये कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

2. रिकी पाँटिंग (विजयी टक्केवारी- 62.33)
कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रदर्शनात आता खूपच जास्त सुधारणा झाली आहे. यामागील सर्वात मोठे कारण त्यांच्याकडील एकापेक्षा एक खेळाडू. सन 2004मध्ये स्टीव्ह वॉ यांनी निवृत्ती घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धुरा रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याच्या खांद्यावर आली होती. पाँटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाची गणना जागतिक क्रिकेटमधील सर्वात खतरनाक संघांमध्ये केली जात होती. पाँटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 77 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांना 44 सामने जिंकण्यात यश आले. यादरम्यान त्यांची विजयी टक्केवारी 62.33 इतकी होती.

1. स्टीव्ह वॉ (विजयी टक्केवारी- 71.92)
कसोटी क्रिकेट प्रकारातील आतापर्यंत सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू स्टीव्ह वॉ (Steve Waugh) यांना ओळखळे जाते. 1999मध्ये फेब्रुवारी महिन्यात मार्क टेलर यांनी निवृत्ती घेतल्यानंतर वॉ यांना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार नेमण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर आपली पहिली कसोटी मालिका खेळली होती. ही कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरीत सुटली होती. वॉ यांच्या नेतृत्वात संघाने सलग 16 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रमही रचला होता, जो भारताने रोखला होता. वॉ यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 57 कसोटी सामन्यांपैकी 41 सामन्यात विजय मिळवला होता. यादरम्यान त्यांची विजयी टक्केवारी 71.92 इतकी राहिली होती. (most successful captains in test cricket history virat kohli to graeme smith see list)

महत्वाच्या बातम्या-
‘IPL ट्रॉफी जिंकणे विश्वचषक जिंकण्यापेक्षा महाकठीण…’, गांगुलीच्या विधानाने देशभरात माजू शकते खळबळ
IPLमध्ये स्टम्प तोडणाऱ्या अर्शदीपचा इंग्लंडमध्ये जलवा, घेतली काऊंटी क्रिकेटमधील पहिली विकेट- व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---