न्यूझीलंड संघापाठोपाठ ऑस्ट्रेलिया संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा किताब जिंकणारा दुसरा संघ बनला. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी नमवले. रविवारी (दि. 11 जून) विजय मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या भारतीय संघावर पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. हा भारतीय संघाचा 2014 नंतरचा अंतिम सामन्यातील चौथा पराभव होता. या विजयासह ऑस्ट्रेलियाला डब्ल्यूटीसी अंतिम सामना जिंकल्यामुळे तगडी बक्षीस रक्कमही मिळाली. दुसरीकडे, पराभूत होऊनही भारताला मोठी बक्षीस रक्कम मिळाली. चला तर कोणत्या संघाला किती रक्कम मिळालीये, जाणून घेऊयात…
डब्ल्यूटीसी अंतिम सामना (WTC Final) जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलिया (Australia) संघाला 13.2 कोटी रुपये मिळाले. यासोबतच अव्वल 5 कोट्यवधींची उधळण झाली आहे. आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकणाऱ्या संघासाठी 1.6 मिलियन डॉलर प्राईज मनी ठेवली होती. या हिशोबाने ऑस्ट्रेलियाला जवळपास 13.2 कोटी रुपये मिळाले.
दुसरीकडे, अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या भारतीय संघाला जवळपास 6.5 कोटी रुपये मिळाले. याव्यतिरिक्त गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी राहिलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला 3.72 कोटी रुपये मिळाले, तर चौथ्या स्थानावरील इंग्लंड संघाच्या खिशात 2.89 कोटी रुपये गेले. तसेच, श्रीलंका संघ पाचव्या स्थानी होता, म्हणून त्यांना 1.65 कोटी रुपये मिळाले.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची बक्षीस रक्कम
ऑस्ट्रेलिया- 13.2 कोटी
भारत- 6.5 कोटी
दक्षिण आफ्रिका- 3.72 कोटी
इंग्लंड- 2.89 कोटी
श्रीलंका- 1.65 कोटी
सामन्याविषयी थोडक्यात
ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. यानंतर त्यांनी दुसऱ्या डावात 270 धावांवर डाव घोषित केला होता. भारतीय संघाने या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या डावात 296 धावा केल्या. तसेच, दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त 234 धावांवरच संपुष्टात आला. भारताच्या पराभवामागे फलंदाजी फळी जबाबदार ठरली. भारतासाठी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि ट्रेविस हेड (Travis Head) यांची भागीदारीही महागात पडली. त्यांच्यात 285 धावांची भागीदारी झाली. भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्यात झाली. त्यांनी 109 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 15 आणि 43 धावांची खेळी साकारली होती. (wtc final 2023 prize money wtc 2023 final australia won by 209 ind vs aus)
महत्वाच्या बातम्या-
‘जरा तरी लाज असेल, तर कर्णधारपद सोड…’, WTC Finalमध्ये पराभूत होताच रोहितवर भडकले चाहते
डब्ल्यूटीसी फायनलमध्येही धोनीच कर्णधार पाहिजे होता! ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीती असेच म्हणाल