भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावांचा डोंगर उभारला आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने पहिल्या डावात 5 विकेट्स गमावत 151 धावा केल्या आहेत. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा याच्या फक्त 15 धावांचा समावेश आहे. मात्र, रोहितने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
काय आहे रोहितचा विक्रम?
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध लंडनच्या के ओव्हल मैदानात खेळल्या जात असलेल्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरताच खास विक्रम रचला. रोहित हा 5 वेगवेगळ्या आयसीसी अंतिम सामन्यात भारतीय डावाची सुरुवात करणारा पहिलाच खेळाडू बनला.
रोहितने आयसीसी अंतिम सामन्यांमध्ये पाच वेळा केलीय डावाची सुरुवात
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात रोहितने पहिल्या डावात 26 चेंडूंचा सामना करत 2 चौकारांच्या मदतीने 15 धावा केल्या. यावेळी पॅट कमिन्स याच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन रोहितला तंबूचा रस्ता धरावा लागला. यापूर्वी तो 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2014च्या टी20 विश्वचषक, 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2021च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघासाठी सलामीला उतरला आहे.
सामन्याची स्थिती
सामन्याविषयी बोलायचं झाल, तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. यामध्ये ट्रेविस हेड याने 163 आणि स्टीव्ह स्मिथ याने 121 धावांची खेळी साकारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या वरच्या फळीतील फलंदाजांकडून चाहत्यांसोबतच संघ व्यवस्थापनाला भरपूर अपेक्षा होत्या. मात्र, रोहित शर्मा (15), शुबमन गिल (13), विराट कोहली (14) आणि चेतेश्वर पुजारा (14) हे 20 धावांचा आकडाही पार करू शकले नाहीत. रवींद्र जडेजा याने यादरम्यान 48 धावांचे योगदान दिले. तसेच, अजिंक्य रहाणे (नाबाद 29) आणि केएस भरत (नाबाद 5) अजूनही खेळपट्टीवर कायम आहेत. (wtc final 2023 rohit sharma has become first player to open in 5 different icc finals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video
एका कॅप्टनने काढला दुसऱ्या कॅप्टनचा काटा, रोहितने स्वत:पेक्षा जास्त पंचांवर दाखवला विश्वास, पाहा Video