जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजा चमकला. जडेजाने लंडनच्या के ओव्हल मैदानात सुरू असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जडेजाने एक नाही, तर दोन विकेट्स घेतल्या. त्याने ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांच्या स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड यांच्या विकेट्स घेतल्या. स्मिथ 47 चेंडूत 34 आणि हेड 27 चेंडूत 18 धावा करून तंबूत परतले. स्मिथने 3 चौकार मारले होते आणि जबरदस्त फकटेबाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळवून देऊ इच्छित होता, पण जडेजाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
शार्दुल ठाकूरने घेतला झेल
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील 31व्या षटकातील पहिल्या चेंडूवरच स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला तंबूचा रस्ता दाखवला. जडेजाने पहिला चेंडू टाकताच स्मिथने पुढे येऊन लाँग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला आणि चेंडू बॅटची कड घेत हवेत उंच उडाला. तिकडे पॉईंटवर उभ्या राहिलेल्या शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हा वेगाने धावला आणि नजर चेंडूवर कायम ठेवली. चेंडू जसा खाली आला, तसा शार्दुलने शानदार झेल पकडत स्मिथला तंबूचा रस्ता दाखवला.
Gone GONE GONE JADEJA GETS BIG FISH STEVE SMITH GONE#WTCFinal2023#WTCFinal #WTC23Final #Jadeja #INDvsAUS #AUSvsIND #WTC2023 pic.twitter.com/JW1KBWBr7s
— Muhammad Asad (@masad33461111) June 9, 2023
शेवटी पहिल्या डावात शानदार शतक झळकावणाऱ्या स्मिथला दुसऱ्या डावात 34 धावा करून तंबूचा रस्ता धरावा लागला. यानंतर जडेजाने हेडलादेखील आपल्याच चेंडूवर स्वत: झेल पकडत तंबूत पाठवले.
Number of times Sir Jadeja dismissed Steve Smith in Tests:#AUSvIND #WTCFinal2023 pic.twitter.com/zBm4v9yWsH
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) June 9, 2023
जर्सीवरील नंबर ठरवला खरा
जडेजाने यासोबतच आपल्या जर्सीवर छापलेला नंबर खरा ठरवला. खरं तर, जडेजाचा जर्सी नंबर 8 आहे. तसेच, त्याने कसोटीत स्मिथलाही इतक्याच वेळा बाद करण्याचा विक्रम केला आहे. आता तो कसोटी इतिहासात स्मिथला सर्वाधिक बाद वेळा बाद करणारा गोलंदाज बनला आहे. स्मिथला कसोटीत सर्वाधिक 9 वेळा बाद करण्याचा विक्रम स्टुअर्ट ब्रॉड याच्या नावावर आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 विकेट्स गमावत 123 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे त्यांच्याकडे 296 धावांची आघाडी आहे. (wtc final 2023 steve smith wicket on ravindra jadeja ball shardul thakur took catch see video)
महत्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यात चाहतीची शुबमनला लग्नाची मागणी; महिला युजरही म्हणाली, ‘पोरगी क्यूट, आता साराचं कसं?’
गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश