जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगात आहे. भारतत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही लढत लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर सुरू आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने सुरुवातीच्या विकेट्स झटपट गमावल्या. पण अजिंक्य रहाणेने भारताचा डाव सांभाळला. ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या ट्रेविस हेडविषयी सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर अशा चर्चा रंगल्या आहेत की, ट्रेविस हेड भारताविरुद्ध डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात शतक करू शकला, कारण बाबर आझम () याने त्याला ती बॅट भेट दिली होती. सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला जात आहे, ज्यामध्ये बाबर आझम ट्रेविस हेड याला एक बॅट भेट म्हणून देत आहे. नेटकरी असे म्हणत आहेत की, भारताविरुद्ध डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात देखील हेड त्याच बॅटने खेळला, जी त्याला बाबरने भेट म्हणून दिली होती. माहितीनुसार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ ऑस्ट्रेलियन संघ 2021-22मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर आला असतानाचा आहे.
नेटकरी जरी असा दावा करत असले, तरी भारताविरुद्ध हेड नवीन बॅटसह मैदानात उतरल्याचेच दिसते. व्हिडिओत दिसत असलेल्या बॅटचे स्टीकर हे हिरव्या रंगाचे आहेत. मात्र डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात हेटच्या बॅटचे स्टीकर वेगळ्या रंगाचे आहेत. प्रत्येकजण याविषयी आपले वेगळे मत व्यक्त करत आहे.
#BabarAzam ne #TravisHead ko apna bat de kar#india ke against sazish krdi@wwasay @Rizzvi73#WTCFinal2023 #WTC23Final #WTC23 #Gill #ShubmanGill #ViratKohli pic.twitter.com/QhzaHB2Sub
— Muhammad Shehroz ???????? (@Iam_Shehroz) June 8, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 121.3 षटकांमध्ये 469 धावा केल्या. यात हेडचे योगदान सर्वात मोठे होते. त्याने 174 चेंडूत 163 धावा केल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 5 बाद 151 धावा केल्या. भारताने पहिल्या पाच विकेट्स झटपट गमावल्या असल्या, तरी अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा संघासाठी तारणहार ठरला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रहाणेने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात अर्धशतक करणारा रहाणे पहिला भारतीय ठरला आहे. (WTC Final 2023 Travis Head scored a century with a bat gifted by Babar Azam?)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मानलं रे! 18 महिन्यांनी कमबॅक करत रहाणेने रचला इतिहास, WTC Finalमध्ये फिफ्टी झळकावणारा पहिलाच इंडियन
निवांत रहा! पिछाडीवर असूनही भारतीय संघ जिंकू शकतो WTC फायनल, कशी ते वाचाच