जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी (11 जून) भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला. दुसऱ्या डावातील 47व्या षटकात भारताने दोन महत्वाच्या विकेट्स गमावल्या. स्कॉट बोलंड या षटकात गोलंदाजी करत होता आणि भारतीय संघाला विजयासाठी अजून 261 धावा हव्या होत्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संघातील हा डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी (11 जून) विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी डावाची सुरुवात केली. चौथ्या दिवासाखेर भारताने 3 बाद 164 धावा केल्या होत्या. त्यावेळी विराट 44*, तर अजिंक्य रहाणे 20* धावांसह खेळपट्टीवर कायम होते. शेवटच्या दिवशी हे दोघे मोठी भागादारी करून संघाच्या विजयात हातभार लावतील असे वाटत होते. मात्र, स्कॉट बोलंड (Scott Boland) याच्या चेंडूवर विराटने विकेट गमावली आणि भागीदारी 86 धावांवर तुटली.
भारतीय संघाला शेवटच्या दिवशी 280 धावा हव्या होत्या. विराट आणि रहाणेने ऑस्ट्रेलियन संघाची आघाडी 261 धावांपर्यंत आणली, पण त्यानंतर एकाच षटकात दोन झटके भारताला मिळाले. दुसऱ्या डावातील 47 व्या षटकात स्कॉट बोलँड गोलंदाजीला आला. षटकातील तिसऱ्या चेंडूवर विराटने स्लीप्समध्ये स्टीव स्मिथच्या हातात झेल दिला. विराटच्या विकेटनंतर रिवंद्र जडेजा () खेळपट्टीवर आला. पण अवघ्या दोन चेंडूत त्याने शुन्य धावांवर विकेट गमावली. जडेजाने यष्टीरक्षक ऍलेक्स केरीने विकेट गमावली.
सामन्याच्या एकंदरीत विचार केला, तर भारताला विजयासाठी शेवटच्या जावात 444 धावांचे लक्ष्य मिळाले. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 121.3 षटकांमध्ये 469 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 296 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डाव ऑस्ट्रेलियन संघाने 8 बाद 270 घोषित केला. प्रत्युत्तरात भारताने 179 धावांवर 5 विकेट्स गमावल्या. (Virat Kohli and Ravindra Jadeja lost wickets in the same over bowled by Scott Boland.)
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! पुढील WTC सायकलची झाली घोषणा, ‘या’ सहा संघांशी भिडणार टीम इंडिया
पुजाराचा काउंटी अनुभव गेला वाया! सलग दुसऱ्यांदा WTC फायनलमध्ये सर्वांचीच केली निराशा