जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना खेळण्यासाठी अवघ्या तासांचा वेळ उरला आहे. कसोटी क्रिकेटमधील या सर्वात मोठ्या स्पर्धेची ही दुसरी सायकल असून, भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत दोन हात करतील. लंडन येथील ऐतिहासिक ओव्हल मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. मात्र, त्याचवेळी या अंतिम सामन्यासाठी वातावरण कसे असणार आहे, या विषयी माहिती समोर येतेय.
लंडन येथील हवामान सातत्याने बदलत असते. या सामन्याला 7 जूनपासून सुरुवात होतेय. या दिवशी वातावरण अगदी स्वच्छ राहील. पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने पूर्णवेळ खेळ होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी देखील परिस्थिती अशीच राहून खेळात कोणताही व्यक्तय येणार नाही. तिसऱ्या दिवशी मात्र हवेत अधिक गारवा असेल. तसेच वारे देखील थोड्या अधिक वेगाने वाहू शकते. चौथ्या व पाचव्या दिवशी मात्र वेधशाळेने पावसाची शक्यता वर्तवली आहे. परंतु, हा पाऊस खेळात बाधा टाकण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सामना राखीव दिवशी न होता पाच दिवसातच सामन्याचा निकाल लागू शकतो.
या सामन्यासाठी वापरण्यात येणारी खेळपट्टी देखील वेगवान गोलंदाजांना पोषक असेल. या मैदानाचे चीफ क्युरेटर यांनी याबाबत स्पष्टता दिली आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा संघाचा मानस असेल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक)
स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी, रौनक साधवानी यांना विजेतेपद
केएस भरतचा मोठा खुलासा, WTC फायनलसाठी धोनीकडून IPL मध्येच घेतल्या आहेत टिप्स
.