जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना रोमांचक पद्धतीने सुरू आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने या सामन्यातील तिसऱ्या दिवशी इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जडेजाने डावखुरा फलंदाज ट्रेविस हेड याला तंबूचा रस्ता दाखवत कसोटी कारकीर्दीतील 267वी विकेट घेतली. हेडची ही विकेट डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील तिसरी विकेट होती. या विकेटसह जडेजा भारताच्या तिन्ही क्रिकेट प्रकारात सर्वाधिक विकेट्स घेणारा डाव्या हाताचा फिरकीपटू बनला.
जडेजाचा विक्रम
वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटपूर्वी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा आधीपासूनच भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा डाव्या हाताचा गोलंदाज होता. आता त्याने हा विक्रम कसोटीतही करून दाखवला आहे. कसोटीतही जडेजा डावखुरा फिरकीपटू म्हणून भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. कसोटीत त्याने भारतीय दिग्गज फिरकीपटू बिशन बेदी यांचा विक्रम मोडला आहे.
तिन्ही क्रिकेट प्रकारात जडेजा आघाडीवर
जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेमार्फत जडेजाने आपल्या कसोटी कारकीर्दीत 267 विकेट्स पूर्ण केल्या. त्याने माजी भारतीय फिरकीपटू बिशन बेदी (Bishan Bedi) यांनी कसोटीत भारतासाठी एकूण 266 विकेट्स घेतल्या होत्या. जडेजाने बेदी यांना पछाडत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
तसेच, वनडेत जडेजा दीर्घ काळापासून भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 174 वनडे सामन्यात 191 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत डावखुरा फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव (Kuldeep Yadav) भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. कुलदीपने 134 विकेट्स विकेट्स घेतल्या आहेत.
याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्येही जडेजाच्या नावावर या विक्रमाची नोंद आधीपासूनच आहे. डावखुरा फिरकीपटू म्हणून जडेजाने टी20त भारतासाठी सर्वाधिक 51 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत चायनामन गोलंदाज कुलदीप यादव 46 विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. (wtc final all rounder ravindra jadeja create history for india as left arm spinner in all three formats)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: चमिंडा वासची MPL मध्ये एन्ट्री, सांभाळले ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद
लॅब्युशेनची ड्रेसिंग रूममध्ये झोपण्याची सवय जुनीच! दिग्गजाने सांगितले झोपेचे कारण