भारतीय संघाचा सामना सुरू असेल आणि भारत आर्मी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित नसेल, असे क्वचितच पाहायला मिळते. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांना मैदानात येऊन सामना पाहण्याची परवानगी नव्हती म्हणून हे समर्थक मैदानात चीयर करताना दिसून येत नव्हते.
परंतु भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चाहत्यांना मैदानात येऊन सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भारत आर्मी देखील भारतीय संघाला चीयर करण्यासाठी मैदानात उपस्थित आहे. त्यांचा कर्णधार विराट कोहलीला चीयर करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात सामना असला तरीही भारत आर्मी तो सामना पाहण्यासाठी आणि संघाला चीयर करण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावत असते. त्यांचा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या आर्मीतील एक सदस्य विराट कोहलीला चीयर करत रॅप सॉन्ग गात असताना दिसून येत आहे. या
सदस्याने, ‘वी विल रॉक यु’ या प्रसिद्ध रॅप साँगवरून, ‘ विराट….विराट…कोहली’ असा रॅप तयार केला आहे. या गाण्याला त्याच्या सहकाऱ्यांनी ढोलची साथ दिली आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या व्हिडिओला ७० हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. (WTC final: bharat army member sung rap song for Virat Kohli video went viral on social media)
https://www.instagram.com/p/CQTeqWiHuLe/?utm_medium=copy_link
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना रोहितने ३४ धावांची खेळी केली; तर शुबमन गिल २८ धावा करत माघारी परतला. तसेच चेतेश्वर पुजाराने अवघ्या ८ धावा केल्या. तर कर्णधार आणि उपकर्णधार मैदानात झुंज देत आहेत. विराट नाबाद ४४ धावांवर खेळत आहे. तर अजिंक्य रहाणे नाबाद २९ धावा करून मैदानात टिकून आहे. दुसऱ्या दिवशी (१९ जून) खराब प्रकाशामुळे हा सामना थांबवण्यात आला. भारतीय संघाने ६४.४ षटक अखेर ३ गडी बाद १४६ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या युवा रणरागिनीने रचला इतिहास, गोलंदाजी अन् फलंदाजीत कमाल करत नोंदवला ‘विश्वविक्रम’
‘विनोदी पंचगिरी’; किवींनी नकार देऊनही पंचांची थर्ड अंपायरकडे धाव, सेहवागने साधला निशाणा
अन् थोडक्यात वाचला पुजारा, वॅग्नरने टाकलेला चेंडू आदळला हेल्मेटवर; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण