भारतीय संघ डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात सुस्थिती पोहोचला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. शेवटच्या डावात भारताला 444 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारतीय संघाने आपल्या तीन विकेट्स 93 धावांवर गमावल्या. संघ पुन्हा एकदा अडचणीत आल्याचे दिसू लागताच स्टॅन्ड्समधून भारतीय खेळाडूंकडू भावनिक साद घालण्यात आली. या चाहत्याच्या हातात पंतचे नाव लिलिहेले पोल्टर पाहायला मिळाले.
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऑस्ट्रेलियातील त्याच्या झंजावातील प्रदर्शनासाठी ओळखला जातो. पंतच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियात जाऊन दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात देखील रिषभ पंत () ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पळता भुई थोडी करू शकत होता. मात्र, दुर्दैवाने तो आपल्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीये. अशात चाहत्यांकडून भारतीय संघाला भावनिक सादा घालण्यात आली. दुखापतीतून सावरणाऱ्या पंतसाठी डब्ल्यूटीसी फायनल जिंका, अशी मागणी या चाहत्याकडून केली गेली. मैदानातील या चाहत्याचा फोटो सध्या सोशल मीडियावनर व्हायरल होत आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा पंतची आढवण करू देत आहे.
Missing pant? pic.twitter.com/G4Srf9oEGi
— RVCJ Sports (@RVCJ_Sports) June 10, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 280 धावा हव्या आहेत. शनिवारी (10 जून) सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने 3 बाद 164 धावा केल्या असून संघाकडे अजून 7 विकेट्स बाकी आहेत. रोहित शर्मा (43), शुबमन गिल (18) आणि चेतेश्वर पुजारा (27) हे महत्वाचे फलंदाज जरी बाद झाले आहे. मात्र, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे खेळपट्टीवर कायम आहेत. त्याव्यतिरिक्त रविंद्र जडेजा, केएस भरत हे फलंदाजही आहे. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर देखील पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात फलंदाजीत कमाल करू शकतो.
भारताला डब्ल्यूटीसीचा हा अंतिम सामना जिंकण्यासाठी शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात संयमी खेळ दाखवाला लागेल. बोतच संघाला आवश्यक धावगतीही राखावी लागणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडून मात्र, झटपट विकेट्स घेण्याच्या पूर्ण प्रयत्न केला जाईळ. (‘Do it for Pant’ A fan’s demand to the Indian team)
महत्वाच्या बातम्या –
रहाणे-विराटच्या खांद्यावर भारताला डब्ल्यूटीसी चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी! शेवटचा दिवस निर्णायक
कसोटीत ऑस्ट्रेलियाला चोपणाऱ्या 5 भारतीयांच्या यादीत विराटचाही समावेश, पण ‘किंग’चा नंबर कितवा?