आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. या अंतिमसामन्यामध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर, खराब कामगिरीमुळे भारतीय संघाला टीकेला सामोरे जावे लागले आहे. संघाने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. 2023 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात ट्रॉफीवर भारतीय संघ नक्कीच नाव कोरेल अशी अनेकांना अपेक्षा होती पण तसे घडले नाही. अनेकांना हे पाहून आश्चर्य वाटते की संघामध्ये सामने जिंकणारे खेळाडू आहेत पण तरीही ते जिंकू शकले नाहीत.
अलीकडेच वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्ट्सनेही (Andy Roberts) भारतीय संघाच्या कामगिरीवर जोरदार टीका केली. अँडी रॉबर्ट्सच्या मते, भारतीय संघ खूप अहंकारी आणि अतिआत्मविश्वासाने भरलेला आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी दिवसेंदिवस खराब होत आहे.
भारताला त्वरित निर्णय घ्यावा लागेल: अँडी रॉबर्ट्स
अँडी रॉबर्ट्सने मिड डेला सांगितले की, “भारतीय क्रिकेटमध्ये हळूहळू अहंकार वाढत आहे. या कारणास्तव भारताने उर्वरित संघांना हलक्यात घेण्याचा विचार केला. कसोटी क्रिकेट खेळायचे की मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळायचे याचा निर्णय त्यांनी घ्यावा. भारतीय संघाने आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवावे अशी माझी इच्छा आहे.”
अजिंक्य रहाणेशिवाय (Ajinkya Rahane) अन्य कोणत्याही खेळाडूने अंतिम फेरीत जबरदस्त फलंदाजी केली नाही. अतिशय खराब शॉट खेळून शुभमन गिल (Shubman Gill) बाद झाला. पहिल्या डावात विराट कोहली (Virat Kohli) एका चांगल्या चेंडूवर बाद झाला. भारताकडे काही चांगले खेळाडू आहेत आणि त्यांनी चांगली कामगिरी केली आहे पण घराबाहेर त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी खूपच खराब आहे. माजी वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला की, “मला त्यांच्याकडून कोणतीही आशा नव्हती. मला माहित होते की संघ लवकरच कोसळेल. भारतीय संघाने दोन्ही डावात अत्यंत खराब फलंदाजी केली.”
महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा