आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे तर्फे आयोजित जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये साउथम्पटनमधील एजस बाउल मैदानावर खेळला जात आहे. परंतु या सामन्यांमध्ये पावसाने अनेक वेळा व्यत्यय आणलेल्या आहे. पाचव्या दिवसाचा खेळ देखील पावसामुळे उशिरा सुरू झाला. चौथ्या दिवशीही पावसामुळे एकही चेंडू न टाकता खेळ रद्द करण्यात आला. इतके होऊनही चाहत्यांचा उत्साह काही कमी झाला नाही. ते पावसात देखील मैदानावर उपस्थित होते. दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हा अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक भारतीय चाहते एजिस बाउल मैदानावर पोहचले आहेत. सर्व चाहते भारतीय संघाला जोरदार पाठिंबा देत आहेत.
पण, सोमवारी स्टेडियमवर एक वेगळाच नजारा पाहायला मिळला. भारतीय संघाचे चाहते तिरंगा, क्रिकेट जर्सी आणि ढोल यासह स्टेडियमवर पोहोचत आहेत. याचदरम्यान 2 विदेशी चाहते देखील भारतीय चाहत्यांमध्ये सहभागी झाले होते. या दोन विदेशी चाहत्यांनी चक्क पंजाबी ढोलाच्या तालावर जोरदार भांगडा केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
https://www.instagram.com/p/CQaysppn8P5/
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने सर्वांच्या आनंदावर पाणी फिरवले होते. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. भारतीय संघाचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला होता. न्यूझीलंड संघाकडून काइल जेमिसनने 5 बळी घेतले. तर भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणे सर्वाधिक 49 धावा केल्या आणि विराट कोहलीने 44 धावा केल्या.
त्यानंतर, न्यूझीलंड पहिल्या डावात फलंदाजी करत असताना चौथ्या दिवशी देखील खेळ पावसामुळे पुन्हा एकदा होऊ शकला नाही. त्यानंतर पाचव्या दिवशी मात्र, संपूर्ण दिवसाचा खेळ झाला. पाचव्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांवर संपुष्टात आला आणि त्यांनी 32 धावांची आघाडी घेतली. आता 23 जूनचा दिवस या सामन्यासाठी राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. त्यामुळे 23 जून रोजी सर्वांना कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला विजेता मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉकडाऊनमध्ये पत्नीने कापले होते पुजाराचे केस; खुलासा करत म्हणाला, ‘पूजाने माझे केस फक्त एकदा…’
तयारी श्रीलंका दौऱ्याची! फिटनेससाठी हार्दिक पंड्या गाळतोय घाम; शर्टलेस फोटो व्हायरल
साऊदीसमोर रोहित नेहमीच टेकतो गुडघे! कारकीर्दीत तब्बल ‘इतक्या’ वेळा केले आहे बाद