---Advertisement---

निवांत रहा! पिछाडीवर असूनही भारतीय संघ जिंकू शकतो WTC फायनल, कशी ते वाचाच

On: शुक्रवार, जून 9, 2023 9:27 AM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आले आहेत. इंग्लंड येथील ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या दोन दिवशी ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व राहिले. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने आपले पाच बळी गमावून 151 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उभारलेल्या 467 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला अजूनही हा सामना जिंकण्याची संधी आहे. 

या कसोटी सामन्यात अजून आणखी तीन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. या उर्वरित तीन दिवसांमध्ये भारतीय संघाने आपला खेळ सर्वोच्च दर्जाचा केल्यास भारतीय संघ विजय देखील संपादन करू शकतो. तिसऱ्या दिवशी सकाळी भारतीय संघासमोर सर्वात मोठे आव्हान असेल ते फॉलोऑन टाळण्याचे. फॉलोऑन टाळण्यासाठी भारतीय संघाला आणखी 120 धावांची गरज आहे. खेळपट्टीवर अजिंक्य रहाणे व केएस भरत ही जोडी असून, अष्टपैलू शार्दुल ठाकूर फलंदाजीला येणे बाकी आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ फॉलोऑन वाचवू शकतो.

यापूर्वी फॉलोऑन मिळूनही ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची कामगिरी भारतीय संघाने केली आहे. 2001 कोलकाता कसोटीत मिळाल्यानंतर राहुल द्रविड व व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या ऐतिहासिक भागीदारीने भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरलेला.

त्या कामगिरीपासून प्रेरणा घेत भारतीय संघाला या सामन्यात पुनरागमन करता येईल. यासाठी दुसऱ्या डावात भारतीय संघाची भिस्त प्रमुख फलंदाजांवर असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा व विराट कोहली हे पहिल्या डावात 15 धावांचा टप्पा देखील पार करू शकले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या डावात त्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. याखेरीज दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाचा डाव झटपट संपुष्टात आणून, भारताला विजेतेपद मिळवून देण्याची संधी असेल.

(WTC Final India Hoping For Win Need Strong Batting In 2nd Inning)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमवीर रोहित! 15 धावांवर बाद होऊनही रचला इतिहास, ICC Finalमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकटाच खेळाडू
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---