जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाने घोळ घातला आहे. पहिल्या दिवशी नाणेफेकही नाही झाली. अचानक झालेल्या पावसाने सर्व क्रिकेट चाहत्यांना उदास केले आहे. पूर्ण २ वर्षांच्या कालावधीनंतर हा अंतिम सामना खेळवला जात आहे. पावसामुळे खेळपट्टीमध्येही बदल होतील उन्हाचे वास्तव्य नसल्यामुळे खेळपट्टी कोरडी होणार नाही. त्यामुळे अनेक चाहत्यांनी भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये काही बदल होतील का? असे प्रश्न विचारले आहेत.
भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधरने स्पष्टपणे सांगितले आहे कि, जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यात आता भारतीय अंतिम ११ मध्ये कोणतेच बदल केले जाणार नाहीत. अंतिम सामन्यात पावसामुळे पहिला दिवसाचा खेळ नाही झाल्यावर त्यांनी अंतिम एकादशमध्ये कोणतेच बदल करण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले, “आम्ही जे खेळाडू निवडले आहेत. ते कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम आहेत. त्यामुळे नियोजित संघामध्ये कसलाही बदल केला जाणार नाही.”
इंग्लंडमधील हवामान हे अचानक बदलताना दिसत आहे. आता सध्या हवामानात थंडावा असून आकाशात ढग दाटून येत असल्याचे दिसत आहे. पावसामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याचा पहिला दिवस रद्द करण्यात आला. यानंतर अनेक क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला की, बदलेल्या परिस्थितीनुसार भारतीय संघ ३ वेगवान गोलंदाज आणि २ फिरतीपटूंसोबत खेळेल का?
पहिला दिवस पावसामुळे रद्द झाल्यानंतर श्रीधर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, “पहिला प्रश्न हाच असावा अशी मला अपेक्षा होती. परंतु आम्ही निवडलेले जे खेळाडू अंतिम ११ मध्ये आहेत, ते कोणतीही खेळपट्टी आणि परस्थितीमध्ये खेळण्यास सक्षम आहेत. मला विश्वास आहे की अंतिम ११ संघ कोणत्याही खेळपट्टीवर आणि हवामान स्थितीत खेळू शकतो आणि उत्कृष्ट प्रदर्शन करू शकतो. तरीही गरज पडल्यास योग्य तो निर्णय घेण्यात येईल.”
युवा खेळाडू शुबमन गिलविषयी श्रीधर म्हणाले की, “इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मालिकेत शुबमन गिलचे प्रदर्शन सरासरी राहिले असूनही तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. तो एक उत्तम क्रिकेटपटू आहे. मी त्याच्या फलंदाजी तंत्राबद्दल सांगू शकत नाही कारण विक्रम राठोड (फलंदाजी प्रशिक्षक) तुम्हाला याचे योग्य उत्तर देतील. माझ्या थ्रो-डाउनवर शुबमनने फलंदाजी केली आणि त्याचा फॉर्म चांगला आहे असे दिसते. त्याच्या रणनीतीविषयी त्याचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. ”
महत्वाच्या बातम्या
WTC Final, भारत वि. न्यूझीलंड: पहिल्या दिवशी पाऊस बनला खलनायक, ‘या’ नियमांनुसार होणार पुढील खेळ
मोठी बातमी! ‘फ्लाइंग सिख’ काळाच्या पडद्याआड; महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन
उर्वरित आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सहभागाविषयी कर्णधार फिंचचे मोठे विधान, म्हणाला…