इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन नेहमी असे काहीतरी वक्तव्य करतात, ज्यामुळे भारतीय चाहते त्यांना ट्रोल करताना दिसून येतात. पुन्हा एकदा मायकल वॉन यांनी भारतीय चाहत्यांना छेडण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचा दुसरा डाव 170 धावांमध्ये आटोपला. जसे भारतीय संघाचा हा डाव संपला, तसे मायकल वॉन भारतीय चाहत्यांच्या जखमांवर मीठ चोळायला सुरुवात केली. (Former England captain Michael Vaughan once again tried to tease Indian fans)
मायकल वॉन यांनी भारतीय चाहत्यांना छेडत ट्वीट केले की, “मला असं वाटत आहे की, काही तासांमध्येच मी केलेल्या खराब भविष्यवाणीसाठी हजारो भारतीय चाहत्यांची माफी मागावी लागेल. ज्यामध्ये मी म्हणालो होतो की, न्यूझीलंड संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना जिंकेल.” तुम्हाला माहितीच असेल की, जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना सुरू होण्याअगोदरच वॉन यांनी न्यूझीलंड संघ हा अंतिम सामना जिंकण्याची भविष्यवाणी केली होती. त्यानंतर भारतीय चाहत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती.
https://twitter.com/MichaelVaughan/status/1407695490976780289
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाच्या फलंदाजांनी खराब प्रदर्शन करत सर्वांना निराश केले. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी सज्ज असलेला भारतीय संघाचा दुसरा डाव 170 धावांमध्ये आटोपला. याचप्रमाणे न्यूझीलंड संघाला अंतिम सामना जिंकण्यासाठी 139 धावांचे लक्ष्य मिळाले.
मायकल वॉन यांनी भारतीय चाहत्यांना चिडवले
अंतिम सामन्याच्या सहाव्या आणि शेवटच्या दिवशी कर्णधार विराट कोहलीला जेमिसनने फक्त 13 धावांमध्ये बाद केले. विराट कोहली या कसोटी सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा जेमिसनचा शिकार बनला. यानंतर पुजाराला देखील जेमिसनने 15 धावांवर बाद केले, तर उपकर्णधार रहाणे देखील 15 धावांवर बोल्टचा शिकार झाला. रिषभ पंतने 41 धावा केल्या, परंतु पंतदेखील खराब शॉट खेळत आऊट झाला. पुढे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा देखील 16 धावा बनवत तंबूत परतला.
दुसऱ्या डावामध्ये न्यूझीलंड संघाच्या वेगवान गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपल्या वेगवान गोलंदाजीने भारतीय फलंदाजांची दैना केली. टीम साऊदीने 4 बळी घेतल्या, तर ट्रेंट बोल्ट 3 बळी आणि जेमिसन ने 2 बळी घेतले. याव्यितिरिक्त वॅगनरने 1 बळी घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन ठरला २१ व्या शतकातील सर्वात महान कसोटी फलंदाज; ‘या’ दिग्गजाला मागे टाकत पटकावला मान
…अन् चाहत्यांचे सेलिब्रेशन क्षणात बदलले निराशेत, पाहा कॅमेरामनने टिपलेला भन्नाट व्हिडिओ





