---Advertisement---

‘मी असं कधीच पाहिलं नाही…’, रहाणेच्या बॅटिंग Technique बद्दल एबी डिविलियर्सची मोठी प्रतिक्रिया

On: शनिवार, जून 10, 2023 6:25 PM
Ajinkya-Rahane-And-AB-De-Villiers
---Advertisement---

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात 89 धावांची झंझावाती खेळी साकारली. त्याच्या या खेळीचे जगभरातून कौतुक केले जात आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज आणि मिस्टर 360 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्स याचाही समावेश झाला आहे. त्याने रहाणेच्या तंत्राची प्रशंसा केली आहे. त्याने ट्वीट करत रहाणेच्या तंत्राचे कौतुक करत म्हटले की, “मी यापूर्वी असे कधीच पाहिले नव्हते की, रहाणे इतक्या चांगल्याप्रकारे खेळत आहे.”

तब्बल 18 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने शानदार खेळी साकारली. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या आव्हानापुढे भारताचा फॉलोऑन टाळण्यात मोलाची भूमिका बजावली. तो शतक ठोकण्यात हुकला, पण 89 धावांची शानदार खेळी साकारत जगाचे लक्ष वेधले. या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकाराचाही समावेश आहे. रहाणे आणि शार्दुल ठाकूर (51) यांच्यात 109 धावांची भागीदारी झाली, ज्याच्या मदतीने भारताने ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेऊ दिली नाही.

एबी डिविलियर्सकडून कौतुक
एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांच्या ट्वीटचे प्रत्युत्तर देत रहाणेच्या तंत्राबाबत प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “मी अजिंक्य रहाणेला इतक्या चांगल्याप्रकारे खेळताना कधीच पाहिले नाही. त्याचे तंत्र खूपच जबरदस्त आहे आणि तो चेंडू पाहून खेळत आहे.”

विशेष म्हणजे, माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यानेही रहाणेच्या तंत्राविषयी मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “अजिंक्य रहाणेने त्याच्या तंत्रात जरा बदल केला आहे. त्याचे दोन्ही पाय क्रीझच्या आत असतात, तो खूप उशिरापासून खेळत आहे, जी चांगली गोष्ट आहे. मात्र, तो बिल्कुल पुढे जात नाहीये. मी यासोबत 50-50 टक्के आहे. मला 100 टक्के खात्री आहे की, ही खेळण्याची योग्य पद्धत आहे. ही खेळण्याची एक पद्धत आहे आणि नंतर विराट कोहलीची पद्धत आहे.”

अजिंक्य रहाणेची खेळी
जेव्हा भारतीय संघाचे इतर खेळाडू धावांसाठी झगडत होते, तेव्हा रहाणेने विकेट न गमावता टिच्चून फलंदाजी केली. त्याने यादरम्यान 129 चेंडूंचा सामना केला आणि 89 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 11 चौकारांचा पाऊस पाडला. (wtc final mr 360 ab de villiers ultimate praise for ajinkya rahane technique)

महत्वाच्या बातम्या-
गांगुलींमुळे पाँटिंगचं नुकसान! आयपीएल 2024 मध्ये माजी बीसीसीआय अध्यक्ष घेणार ऑस्ट्रेलियन दिग्गजाची जागा
हेडची विकेट काढताच जड्डूने कसोटीत रचला इतिहास! ‘असा’ विक्रम रचणारा बनला पहिलाच भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---