जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारपासून (१९ जून) सुरु झाला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व भारतीय संघाला केवळ २१७ धावांवर सर्वबाद केले. यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत एकदम खराब फटकार मारून तंबूत परतला.
भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज रिषभ पंत कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात पंतने २२ चेंडूत ४ धावा फटकावल्या आणि त्याची विकेट काइल जेमिसनला दिली. आश्चर्य म्हणजे पंत ३० मिनिटे खेळपट्टीवर राहिला पण तरीही त्याच्या खात्यात केवळ ४ धावा आल्या. यानंतर पंतच्या लवकर बाद होण्याऐवजी त्याच्या शॉट निवडीवर अधिक चर्चा होत आहे. कारण या ऐतिहासिक सामन्यात त्याने ज्याप्रकारे आपली विकेट गमावली, त्यामुळे सर्वांना विश्वचषक २०१९ च्या उपांत्य सामन्याची आठवण झाली आहे.
पंतने न्यूझीलंडच्या विरुद्ध फलंदाजी करताना २० व्या चेंडूवर आपले खाते उघडले. यावेळी चौकार मारत त्याने खात्यात चार धावांची नोंद केली. त्यानंतर एक चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुढील चेंडूवरही त्याने घाई करत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी त्याच्या बॅटच्या मध्यभागी चेंडू लागला नव्हता. त्यामुळे स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या टॉम लॅथमने सहज त्याचा झेल पकडला.
पंतची फलंदाजी बघत असताना असे वाटले की, तो खेळपट्टीवर वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहे, जे चुकीचे नव्हते. परंतु पहिला चौकार मारल्यानंतर त्याने असा शॉट खेळला, ज्यामुळे त्याला तंबूत परतावे लागले. काइल जेमिसनने टाकलेला चेंडू हा पाचव्या स्टम्पवर होता. तरीही पंनेत त्या चेंडूला ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडमध्ये अशी चूक करणे म्हणजे विकेट घालवणे आहे.
पंतने आठवण करून दिली २०१९च्या उपांत्य सामन्याची आठवण
एकदिवसीय विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीत भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध २४० धावांचा पाठलाग करत होता. त्या सामन्यात पंत मैदानावर सेट झाला होता. त्याने ५५ चेंडूत ३२ धावा बनवल्या होत्या. परंतु ५६ व्या चेंडूवर त्याने अत्यंत खराब फटकार खेळून बाद झाला. सॅन्टनरच्या चेंडूवर एक मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये कॉलिन डि ग्रँडहोमच्या हातात सोपा झेल दिला. पंतची ही विकेट भारतीय संघाला खूप भारी पडली होती. भारतीय संघाचे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंक्यण्याचे स्वप्न तुटले.
एका मुलाखतीत पंतनेही त्या शॉटबद्दल निराशा व्यक्त केली होती. त्या शॉटनंतर त्याचे हृदय तुटले असे त्याने म्हटले होते. पण ३ वर्षांनंतर पुन्हा एकदा असाच खराब शॉट खेळून पंतने आपली विकेट गमावली आणि हा सामना कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना आहे.
महत्वाच्या बातम्या
एकही चेंडू न टाकता चौथ्या दिवसाचा खेळ रद्द, आजही असेल का पावसाचं सावट? घ्या जाणून
WTC फायनल: पावसामुळे २ दिवस वाया गेल्यानंतर आयसीसीकडून दर्शकांना ‘मोठा दिलासा’