भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथॅम्प्टनच्या द रोज बाउल स्टेडियमवर खेळला जात आहे. पावसामुळे चौथ्या दिवशी (२१ जून) या सामन्याचा खेळ होऊ शकला नाही. तसेच पहिल्या दिवशीही पाऊस पडल्याने पूर्ण दिवस वाया गेला होता. अशातच या सामन्याच्या सहाव्या दिवशी (राखीव दिवस) आयसीसी क्रिकेट चाहत्यांना मोठा दिलासा देऊ शकते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच आयसीसीने या सामन्याच्या शेवटच्या दिवसासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्यातील पहिला आणि चौथ्या दिवशी, पावसामुळे एकही चेंडूचा खेळ खेळला गेला नाही. त्यामुळे सहाव्या दिवशी (राखीव दिवस) आयसीसी तिकिटांचे दर कमी करणार आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी ६४.४ षटकांचा खेळ झाला होता. तर तिसऱ्या दिवशी ७६.३ षटकांचा खेळ झाला होता.
पावसामुळे दोन दिवसांचा खेळ वाया गेला आहे. त्यामुळे हे तर नक्कीच आहे की, या सामन्यात सहाव्या दिवसाचा वापर केला जाणार आहे. आयसीसीच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “होय, सहाव्या दिवशी तिकीटांचे दर कमी केले जातील.”
असे आहेत तिकिटांचे दर
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तिकिटांच्या दराची विभागणी तीन टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे. ज्यामध्ये १५० जिबिपी म्हणजेच १५,४४४ रुपये, १०० जीबिपी म्हणजेच १०,२९६ रुपये आणि ७५ जिबीपी म्हणजेच ७७२२ रुपये आहे. परंतु आता सहाव्या दिवशी तिकिटांची रक्कम कमी करण्यात आली आहे. या दिवशी तिकिटांच्या दर घटवून १०० जिबिपी म्हणजे १०,२९६ रुपये, ७५ जिबिपी म्हणजे ७७२२ रुपये आणि ५० जिबिपी म्हणजेच ५१४८ रुपये करण्यात आले आहे. (Icc to sell tickets for reserve day at reduced rates, know what will be the new rate)
भारतीय संघाला २१७ धावा करण्यात आले यश
भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून ६२ धावांची भागीदारी केली होती. यामध्ये रोहित शर्माने ३४ धावांचे योगदान दिले तर शुबमन गिल २८ धावा करत माघारी परतला होता. या डावात उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले होते. भारतीय संघाला पहिल्या डावात २१७ धावा करण्यात यश आले.
न्यूझीलंड संघ मजबूत स्थितीत
प्रत्युत्तरात डेवोन कॉनवे आणि टॉम लेथम यांनी या सामन्यात देखील न्यूझीलंड संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून ३० षटक फलंदाजी केली. त्यानंतर लेथम ३० धावा करत माघारी परतला. तर चांगल्याच फॉर्ममध्ये असलेल्या डेवोन कॉनवेने या सामन्यात देखील अर्धशतक झळकावले. परंतु त्याला मोठी खेळण्यास अपयश आले. तो ५४ धावा करत माघारी परतला. तसेच न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन नाबाद १२ धावांवर फलंदाजी करत आहे. तर रॉस टेलर नाबाद ० धावांवर फलंदाजी करत आहे. तिसऱ्या दिवस अखेर न्यूझीलंड संघाला २ बाद १०१ धावा करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पावसामुळे कसोटी चॅम्पियनशीप फायनल ड्रॉ झाली तर कोण असेल विजेता? घ्या जाणून
नक्की झाले काय? विराट कोहली आणि दिनेश कार्तिकचा ‘तो’ व्हिडिओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न
आहा…भारीच की! निसर्गाच्या सानिध्यात धोनी कुटुंबांसोबत घालवतोय वेळ; व्हिडिओत दिसला वर्कआऊट करताना