विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारपासून (१९ जून) या सामन्याला जोरदार सुरुवात झाली. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साउथम्पटन येथे चालू असलेल्या या सामन्यातील शनिवारचा खेळ कमी प्रकाशाचा व्यत्यय आल्याने थांबवण्यात आला. शनिवारचा खेळ थांबला तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ६४.४ षटकात ३ बाद १४६ धावा केल्या आहेत. दरम्यान मैदानी पंचांच्या हातून एक चूक घडली, ज्यामुळे चाहत्यांसह क्रिकेटपटूही नाराज झाल्याचे दिसून आले.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिलने संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर जेव्हा कर्णधार विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी आला; तेव्हा काहीतरी वेगळाच प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले.
तर झाले असे की, ४१ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर, ट्रेंट बोल्टने लेग साइडच्या दिशेने चेंडू टाकला. त्या चेंडूवर विराटने फाईन लेगच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु तो चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेला. त्यावेळी यष्टीरक्षक आणि गोलंदाजाने जोरदार अपील केल्याचे पाहायला मिळाले. परंतु अंपयारने हा निर्णय फेटाळून लावला होता.(WTC final Virender Sehwag raised question on umpiring)
त्यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याने रिव्ह्यु घेण्यासाठी मिळणारा अवधी व्यर्थ घालवला होता. त्यानंतर अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी दुसऱ्या मैदानी अंपायरसोबत चर्चा केली आणि चर्चेनंतर दोघांनी रिव्ह्यु घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रिव्ह्युमध्ये स्पष्ट दिसून आले होते की, चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झाला नव्हता.
https://twitter.com/mscsk7/status/1406247152557428737?s=20
अंपायरने घेतलेल्या या निर्णयावर कर्णधार कोहली निराश दिसून आला होता. कारण अंपायरने सुरुवातीला निर्णय फेटाळला होता. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाने रिव्ह्यू घेण्याची मुभा असूनही घेतला नाही. तरीही अंपायरने स्वत: पुढाकार घेत रिव्ह्यू घेतल्याने कोहली वैतागला होता.
Funny umpiring there with Virat.
No decision given by the umpire and it automatically became a review.
Tuning in to the Women’s test match for the time being , hoping for Harman and Punam to save the Test match.— Virender Sehwag (@virendersehwag) June 19, 2021
अंपायरच्या या कृत्यानंतर केवळ कोहलीच नव्हे तर चाहते आणि आजी-माजी क्रिकेटपटूही वैतागले. माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ट्विट करून, अंपायरिंगवर प्रश्न उपस्थित केले. त्याने लिहिले की, ‘विनोदी अंपायरींग. अंपायरने कोणताही निर्णय दिला नाही आणि तो आपोआपच रिव्ह्यू बनला.’
महत्त्वाच्या बातम्या-
अन् थोडक्यात वाचला पुजारा, वॅग्नरने टाकलेला चेंडू आदळला हेल्मेटवर; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण
आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यांत खेळताना विराटचा ‘मोठा’ विक्रम; गंभीर, गांगुलीला टाकलं मागे
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, ‘या’ युवा गोलंदाजाला मिळाली संधी