विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघा एक दिवस उरला आहे. या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी वाट पाहात आहेत. १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना रंगणार आहे. दरम्यान, भारतीय संघाचा ‘व्हेरीव्हेरी स्पेशल’ म्हणजेच व्हीव्हीएस लक्ष्मणने भारतीय संघात कोणते फलंदाज आसवे आणि त्यांचा क्रम काय असावा याबाबत सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे तर्फे आयोजित(आईसीसी) स्पर्धेत भारतीय संघासाठी न्यूझीलंड संघाचे नेहमीच कडवे आव्हान राहिले आहे. विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या साखळी फेरीतही भारतीय संघ फक्त न्यूझीलंड संघाकडून हरला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताकडून कोणते फलंदाज असावे याचे माजी कसोटीपटू लक्ष्मण याने सांगितले.
स्टार स्पोर्ट्सच्या थेट प्रक्षेपणात लक्ष्मण सांगतो कि, “मी भारतीय संघात ५ प्रमुख फलंदाजांसह खेळीन, ६व्या क्रमांकावर मी यष्टीरक्षक रिषभ पंतला स्थान देईन, ७ क्रमांकावर जडेजा असेल आणि ८व्या क्रमांकावर माझा अश्विन असेल.”
लक्ष्मणने सर्वात जास्त भरोसा जडेजावर दाखवला आहे. त्याचं म्हणणे आहे की, दबावात जडेजाचा खेळ उत्तम असतो आणि त्यात त्याची फलंदाजी चांगली होते.
दरम्यान, भारतीय संघ व्यवस्थापनाने अंतिम सामन्यासाठी १५ खेळाडूंची घोषणा केली. त्यात केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांना स्थान दिले गेले नाही. सर्वत्र चर्चा होती की, यंदाच्या आईपीएलमध्ये मयंक अगरवालची फलंदाजी चांगली झाली होती त्यामुळे रोहित सोबत मयंकला संधी मिळेल. परंतु, तसे झाले नाही. आता शुबमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघे सलामीला उतरतील, हे जवळपास निश्चित आहे.
अंतिम सामन्यासाठी निवडण्यात आलेले १५ भारतीय खेळाडू
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे ( उप कर्णधार), रिषभ पंत, रिद्धीमान सहा, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुरा, इशांत शर्मा, मोहमद शमी,मोहमद सिराज, उमेश यादव आणि हनुमा विहारी.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनलमध्ये ‘मोठे’ विक्रम करण्याची विराट कोहली, रोहित शर्माला सुवर्णसंधी