जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८- २२ जून दरम्यान रंगणार आहे. हा सामना भारत आणि न्यूझीलंड संघात होणार आहे . हे दोन्ही संघ साउथॅम्प्टनमध्ये दाखल झाले आहे. दोन्ही संघाने सराव चालू केला आहे. न्यूझीलंड व भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे की कोण बनेल पहिलावहिला जागतिक कसोटी चॅम्पियन. अनेक माजी खेळाडूंनी आपापल्या अंदाजानुसार अंतिम सामन्यासाठी भारताची प्लेयिंग ११ निवडली आहे.
आता भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारताचा अंतिम ११ जणांचा संघ निवडला आहे. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोपडाने निवडलेल्या संघात रवींद्र जडेजा आणि इशांत शर्माला स्थान नव्हते दिले. परंतु इंग्लंडमधील परिस्तिथी पाहून जाफरने दोघांना जागा दिली आहे.
माजी भारतीय फलंदाज ४३ वर्षीय वसीम जाफरने अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला महत्त्वपूर्ण खेळाडू सांगितले आहे, कारण त्याला १०० हुन अधिक कसोटी सामने खेळण्याचा व काउंटी क्रिकेट खेळण्याचाही अनुभव आहे. जाफरने मोहम्मद सिराजचे ही कौतुक केले आहे, ज्याने ३ कसोटी सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी सिराजला चेंडूला दोन्ही दिशेने स्विंग करण्याच्या क्षमतेमुळे आपल्या संघात निवडले आहे.
जाफरने आपल्या युटूब चॅनेलवर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी निवडलेल्या अंतिम ११ जणांच्या संघाबद्दल सांगितले आहे. जाफरने सांगितले, “मला असे वाटे की वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी संघात आपले स्थान संघात पक्के ठेवतील. ते दोघीही अप्रतिम गोलंदाज आहेत. त्याच्या सोबतीला इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज मध्ये एक पर्याय असेल.”
याबरोबरच जाफरने आर अश्विन आणि जडेजा या दोन्ही फिरकीपटूंना संघात स्थान दिले आहे. तसेच त्याचे म्हणणे आहे की विराट कोहलीने अंतिम सामन्यात थोडे आक्रमक राहावे.
जाफर म्हणाला “मी ठामपणे दोन्ही फिरकीपटूंसोबत जाईल कारण ते दोघंही फलंदाजी करू शकतात, त्यामुळे जडेजा हा ७ व्या तर अश्विन हा ८ व्या स्थानावर फलंदाजी करतील आणि दोघांनी कसोटी क्रिकेटमध्ये शतक केले आहे. तुमच्याकडे एक ऑफ स्पिनर आणि एक डाव्या हाताचा स्पिनर खेळवण्याचे स्वतंत्र मिळते. चेंडू हा सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी फिरेल.” (WTC Final Wasim Jaffer Selected India’s Playing XI)
जाफर पुढे म्हणाला, “रवी शास्त्री हे चांगलं ओळखतात, विराट नेहमी आक्रमक विचाराने मैदानात उतरतो. मला विश्वास आहे की भारतीय संघ ५ गोलंदाजांसोबत मैदानात उतरतील. ”
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी जाफरचा अंतिम ११ जणांचा भारतीय संघ –
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली (कर्णधार) , अजिंक्य राहणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
महत्वाच्या बातम्या
आमिरच्या चेंडूवर फलंदाजाने गुडघ्यावर बसत खेचला चौकार, मग गोलंदाजाने चिडून केलं असं काही
व्हीव्हीएस लक्ष्मणने रोहित शर्माला दिला मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘या’ गोलंदाजापासून सावधान