वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबल 2023-25: टीम इंडियाने यंदाच्या घरच्या कसोटी हंगामाची सुरुवात जोरदार शैलीत केली. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 अंतर्गत खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा पराभव केला. चेन्नई कसोटी सामन्यात भारताने बांग्लादेशचा 280 धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीत भारताचा बांग्लादेशविरुद्धचा हा सर्वात मोठा कसोटी विजय आहे. या विजयामुळे टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या पॉइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. तर बांग्लादेशला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग पाचवी कसोटी जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आधीच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर होती. आता या विजयासह संघाने आघाडी घेतली आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ 68.52 टक्के विजयासह पहिल्या क्रमांकावर होता आणि अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र विजयाची टक्केवारी 71.67 झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 62.50 टक्के विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ 50 टक्के विजयाच्या टक्केवारीसह आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. त्याचे गुणतालिकेत बदल होऊ शकतो.
बांग्लादेशचा संघ या सामन्यापूर्वी 45.83 विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर होता. पण आता 39.28 टक्के विजय गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. भारताच्या विजयाचा आणि बांग्लादेशच्या पराभवाचा फायदा श्रीलंका आणि इंग्लंडला झाला आहे. श्रीलंकेचा संघ 42.86 विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानावर असून त्याच्या खात्यात 42.19 विजयाची टक्केवारी आहे. सातव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (38.89), आठव्या क्रमांकावर पाकिस्तान (19.05) आणि शेवटच्या म्हणजे नवव्या क्रमांकावर वेस्ट इंडिज (18.52) आहे.
हेही वाचा-
‘द रेकाॅर्ड मॅन’, चेन्नई कसोटीत अश्विनची अष्टपैलू कामगिरी, विक्रमांचा पाऊस!
चेन्नई कसोटीत भारताचा शानदार विजय; आर अश्विनचा डबल धमाका, बॅटिंगपाठोपाठ बॉलिंगमध्येही कमाल!
समित द्रविडचे टीम इंडियासाठी पदार्पण लांबणीवर? ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा शानदार विजय