टीम इंडियाने पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच (WTC 2024-25) च्या पॉइंट टेबलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सलग तीन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरली होती. मात्र आता पर्थ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया पुन्हा डब्लयूटीसीच्या या मोसमात पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. याशिवाय गुणतालिकेत कोणताही बदल झालेला नाही. पर्थमधील ऑप्टस येथे झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला प्रथमच पराभव पत्करावा लागला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पर्थ कसोटी सामन्यानंतर, भारत 61.11 च्या विजयाच्या टक्केवारीसह डब्लयूटीसी गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ 57.59 च्या विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यांची या डब्लयूटीसी सर्कलमध्ये विजयाची टक्केवारी 55.56 आहे. तर न्यूझीलंडचा संघ 54.55 टक्के विजयासह चौथ्या स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ पाचव्या स्थानावर असून तो न्यूझीलंडपेक्षा मागे नाही. दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 54.17 आहे. इंग्लंडचा संघ 40.79 टक्के विजयासह सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान सातव्या स्थानावर आहे. ज्याची विजयाची टक्केवारी केवळ 33.33 आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या पॉइंट टेबलमध्ये शीर्षस्थानी असणारे दोन संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. ते जून 2025 मध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे. सध्या भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका तसेच न्यूझीलंड हे देश या शर्यतीत आहेत. मात्र, सध्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरी गाठण्याची अधिक शक्यता वाटत आहे.
हेही वाचा-
गाबानंतर पर्थचाही किल्ला ढासळला! पहिल्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय
“शपथ घेऊन सांगतो समोर लागला”, डीआरएस घेण्यासाठी हर्षित राणाचं मजेशीर कृत्य
IND VS AUS; ट्रॅव्हिस हेडच्या विकेटवर जसप्रीत बुमराह – विराट कोहलीचे हटके सेलिब्रेशन: पाहा VIDEO