---Advertisement---

डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार बिग ई चालू सामन्यात गंभीररीत्या जखमी; प्रकृतीबाबत महत्वाचे अपडेट

On: शनिवार, मार्च 12, 2022 9:33 PM
---Advertisement---

अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) या लढती प्रकारातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. डब्ल्यूडब्ल्यूई विजेता‌ बिग ई (WWE Champion Big E) याचा गंभीर अपघात झाला असून, तो सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. ही दुखापत इतकी गंभीर मानली जात आहे की, बिग ई याचा जीव थोडक्यात बचावल्याचे सांगितले जातेय‌.

अशी झाली दुखापत

शुक्रवारी (११ मार्च) स्मॅकडाउनमध्ये टॅग टीम सामना खेळला गेला. या सामन्यात बिग ई आपला साथीदार कोफी किंगस्टन याच्यासह सहभागी झाला होता. त्यांच्याविरुद्ध शेमस व रिज हॉलंड हे खेळत होते. दोन्ही संघांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होत असताना, रिज व बिग ई मैदानाबाहेर भिडत असतात. सरस ठरत असलेल्या रिजने बिग ई ला उचलून फेकले असतात तो मानेवर पडला. त्याला असह्य वेदना होत असलेल्या पाहून, रेफ्रींनी त्याला स्ट्रेचरवरून बाहेर नेले. तसेच त्याची प्रकृती नाजूक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

रेसलमेनिया ३८ मधील सहभागाबाबत अनिश्चितता

डब्ल्यूडब्ल्यूई मधील सर्वात मानाची समजली जाणारी रेसलमेनिया ही स्पर्धा २ एप्रिल रोजी खेळविण्यात येणार आहे. बिग ई सह अनुभवी रेसलर बॉबी लेस्ली हा देखील दुखापतग्रस्त असल्याने तो या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

बोर्डाशी बाचाबाची केल्यानंतर बांगलादेशचा ‘हा’ खेळाडू झाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तयार, वाचा सविस्तर (mahasports.in)

आयपीएल सुरू होण्याआधी दिसला हार्दिक पांड्याचा नवा अवतार, बनला ‘बॉम्ब एक्सपर्ट’ (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---