---Advertisement---

केकेआरच्या ‘मॅच विनर’ वेंकटेशला WWE रेसलरकडून आयपीएलसाठी खास संदेश, पाहा काय म्हणाला?

On: शुक्रवार, मार्च 25, 2022 11:12 PM
Venkatesh-Iyer
---Advertisement---

आयपीएल २०२२ चा पहिला सामना २६ मार्चला कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघ आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याच्या दृष्टीने उतरणार आहेत. हा सामना सुरू होण्यापूर्वी कोलकाताचा सलामीवीर फलंदाज व्यंकटेश अय्यरला खास संदेश मिळाला आहे. त्याला हा संदेश त्याचा आवडता खेळाडू डब्ल्यूडब्ल्यूईमधील रेसलर रोलिन्सने (WWE Wrestler Rollins) पाठवला आहे. 

व्यंकटेशला केकेआर संघाने आयपीएल २०२२ च्या लिलावात (IPL 2022 Mega Auction) रिटेन केले आहे. त्याने मागील हंगामात दमदार कामगिरी करत संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते. मागील हंगाम हा त्याचा पहिला आयपीएल हंगाम होता आणि त्याने पदार्पणाच्या हंगामातच उत्तम कामगिरी केली होती. यावेळी सुद्धा तो संघासाठी चांगली खेळी खेळताना दिसेल.

तत्पूर्वी रोलिन्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो डब्ल्यूडब्ल्यूई भारताने आपल्या इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये व्यंकटेशला संदेश देताना रोलिन्स म्हणाला, “व्यंकटेश माझ्या मित्रा. हा मी सेथ फ्रीकिन रोलिन्स आहे. तू माझा चाहता आहेस, याचे मला आश्चर्य वाटत नाही. माझ्या मित्रा ही चांगली गोष्ट आहे. पण आता तुझ्यासमोर इंडियन प्रीमियर लीग आहे. म्हणूनच हा चषक जिंकण्यासाठी तुला माझ्या शुभेच्छांची गरज असेल. म्हणून एका द्रष्ट्याच्या आशीर्वादासाठी स्वतःला तयार हो. जा आणि जोरदार खेळ.”

पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा व्यंकटेशवर खिळल्या आहेत. गेल्या मोसमात तो संपूर्ण हंगाम खेळला नव्हता. आत्तापर्यंत तो आयपीएलमध्ये फक्त १० सामने खेळला आ,हे पण इतक्या सामन्यांमध्ये त्याने तो सर्वोत्तम खेळाडू असल्याचे दाखवले आहे. आतापर्यंत खेळलेल्या १० आयपीएल सामन्यांमध्ये या खेळाडूने ४१.११ च्या सरासरीने ३७० धावा केल्या आहेत. १० पैकी ४ सामन्यात त्याने अर्धशतकीय खेळा खेळली आहे. व्यंकटेशकडे  गोलंदाजीत चमत्कार करण्याची क्षमता आहे आणि त्याने आयपीएलमध्ये तीन विकेट्सही घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

सीएसके अन् केकेआरचे हुकुमी एक्के, ज्यांच्यावर सर्वांचीच असेल नजर; एकटा राहिलाय ऑरेंज कॅप विजेता

दोन फ्रँचायझी वाढल्या तरीही ‘हाच’ संघ सर्वांचा बाप, यंदाही पटकावणार आयपीएल ट्रॉफी! दिग्गजाचे भाकीत

आयपीएलपूर्वी संजू आणि राजस्थान रॉयल्समध्ये उडाले खटके! कर्णधाराने ट्वीटर अकाउंट केले अनफॉलो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---