---Advertisement---

ट्रिपल एच म्हणतोय, ‘…तर मी असतो दुसरा सचिन तेंडुलकर’

On: शुक्रवार, जानेवारी 22, 2021 11:43 PM
---Advertisement---

भारतात क्रिकेट प्रमाणेच डब्ल्यूडब्ल्यूई देखील मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार्स भारतात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असून या सर्वात आघाडीचा क्रमांक येतो तो ट्रिपल एचचा. ट्रिपल एच आपली बॉडी व एकूणच रिंग मधील कामगिरमुळे सर्व डब्ल्यूडब्ल्यूई प्रेमींचा चहिता आहे. ट्रिपल एच सध्या डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये खेळाडू म्हणून सहभाग न घेता, व्यवस्थापकाच्या भूमिकेत आहे. अशातच एका कार्यक्रमादरम्यान ट्रिपल एचने क्रिकेटबद्दल आपली आवड स्पष्ट केली असून, त्याच्यामते जर तो क्रिकेट खेळत असता तर सचिन प्रमाणेच उत्तम खेळाडू असता.

एका कार्यक्रमादरम्यान मुलाखतकाराने ट्रिपल एचला क्रिकेट संदर्भात प्रश्न विचारला असता तो म्हणाला ,” माझ्यामते मी कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतो. जर मी क्रिकेटला माझं करिअर निवडलं तर मी क्रिकेटमध्ये देखील सर्वोत्तम असतो. मी सचिनसारखा नाही पण सचिन प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला असता. कदाचित मी पुढचा सचिनही झालो असतो.”

ट्रिपल एचचा इंटरव्यू मोठ्या प्रमाणावर पसंत केला जात असून, सोशल मीडिया देखील तो मोठ्याप्रमाणात वायरल होत आहे. आगामी प्रजासत्ताक दिनानिमित्त डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये भारतीयांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत बांगलादेशची मालिकेत विजयी आघाडी

ठरलं! आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव ‘या’ तारखेला होणार 

मुंबई लोकलमध्ये जागा मिळवणे कठीण की ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा सामना करणे? शार्दुलने दिले ‘हे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---