नागपुर। नागपुर जिल्हा हार्ड कोर्ट टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने चौथ्या मानांकित थायलंडच्या पुनीन कोवापिटूटेडचा 6-2, 6-1 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
नागपूर,रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित झील देसाईने डेन्मार्कच्या एलेना जमशेदीचा 6-2, 6-1 असा, तर सहाव्या मानांकित जेनिफर लुईखेमने हुमेरा बहारमूसचा 2-6, 6-3, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकित वैदेही चौधरी हिने युब्रानी बॅनर्जीचा 6-2, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली.
साई संहिता चमर्तीने स्मृती भसीनचे आव्हान 6-4, 6-3 असे संपुष्टात आणले.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत साई संहिता चमर्थी व सोहा सादिक या जोडीने दुसऱ्या मानांकित जेनिफर लुईखेम व मिहिका यादव यांचा 6-3, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. भारताच्या वैदेही चौधरीने जर्मनीच्या एमिली सेबोल्डच्या साथीत हुमेरा बहारमूस व युब्रानी बॅनर्जी यांचा 6-2, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
एकेरी: महिला: दुसरी फेरी:
वैदेही चौधरी(भारत)[5]वि.वि.युब्रानी बॅनर्जी(भारत) 6-2, 6-1
समा सात्विका(भारत)[7] वि.वि. श्रेया तातावर्ती(भारत) 6-4, 6-2
एमिली सेबोल्ड(जर्मनी)[3] वि.वि.श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती(भारत) 7-6(4), 6-3
साई संहिता चमर्ती(भारत) वि.वि. स्मृती भसीन(भारत)6-4, 6-3;
सहजा यमलापल्ली(भारत)वि.वि.पुनीन कोवापिटूटेड(थायलंड)[4] 6-2, 6-1
जेनिफर लुईखेम(भारत)[6] वि.वि.हुमेरा बहारमूस(भारत) 2-6, 6-3, 6-1;
झील देसाई(भारत)[1]वि.वि.एलेना जमशेदी(डेन्मार्क) 6-2, 6-1;
ऍना उरके(रशिया)[2]वि.वि.प्रत्युशा रचापुडी(भारत) 3-6, 6-3, 6-3
दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी:
साई संहिता चमर्थी(भारत)/सोहा सादिक(भारत)वि.वि.जेनिफर लुईखेम(भारत)/मिहिका यादव(भारत)[2] 6-3, 6-1;
श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती(भारत)/समा सात्विका(भारत)पुढे चाल वि.स्टेफनी और(ऑस्ट्रिया)/इलारिया स्पोशेट्टी(इटली)
निधी चिलूमुला(भारत)/सौम्या विज(भारत)[3]वि.वि.दक्षता पटेल(भारत)/ईश्वरी माथेरे(भारत)6-1, 6-1;
वैदेही चौधरी(भारत)/एमिली सेबोल्ड(जर्मनी)[1]वि.वि.हुमेरा बहारमूस(भारत)/युब्रानी बॅनर्जी(भारत)6-2, 6-2.
महत्त्वाच्या बातम्या –
२६व्या ग्रोव्हर वाईनयर्ड्स आंतरक्लब अजिंक्यपद स्पर्धेत पुना गोल्फ क्लब संघाला विजेतेपद
विराटचा १०० व्या कसोटीत बीसीसीआय अध्यक्षांच्या विक्रमालाच धक्का, पाहा काय केलाय कारनामा