“मी खूप अस्वस्थ होतो. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये एकत्र जमा झाले. मला वाटले आज काहीतरी धडा आणि सल्ला मिळेल. पण सामना हरल्यानंतरही मला कोणी एका शब्दनेही बोलले नाही. एवढेच नाही तर 5 षटकार मारण्याच्या घटनेवरही कोणी चर्चा केली नाही. जणू काही घडलेच नाही असे वाटत होते… असे म्हणणे आहे भारतीय क्रिकेटपटू आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील गुजरात टायटन्स संघाचे गोलंदाज यश दयालचे. पूर्वी तो त्याच्या वडिलोपार्जित प्रयागराज येथे आला होता. जिथे त्याने माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्याने याबाबतचा खुलासा केला आहे.
आयपीएल 2023 मध्ये केकेआर आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना खेळला गेला होता. ज्यामध्ये यश दयालने एका षटकामध्ये 5 षटकार ठोकले होते. विशेष म्हणजे षटकार ठोकणारे रिंकू सिंग (Rinku Singh) आणि यश दयाल (Yash Dayal) हे खूप जवळचे मित्र आहेत.
दोन मोठे धडे मिळाले
यश दयाल पुढे म्हणाले की त्या घटनेतून त्याला दोन गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्यासोबत ही घटना घडली तो मी पहिला गोलंदाज नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हाही तुम्ही खेळपट्टीवर उतरता तेव्हा तुमचा कोणीही मित्र किंवा खास व्यक्ती नसतो. विरोधी संघ म्हणूनच तुम्हाला खेळ स्वीकारला पाहिजे.
युवा क्रिकेटपटूंना दिला संदेश
त्याने पुढे सांगितले की, प्रयागराजमध्ये क्रिकेटच्या अनेक शक्यता आहेत. त्यासाठी गरज आहे ती चांगली संसाधने आणि वारंवार क्रिकेट सामने खेळण्याची. युवा खेळाडूला संदेश देताना तो म्हणाला की, आम्हाला कोणतेही लक्ष्य सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी धीर धरायला हवा आणि आयुष्यात चढ-उतार येतच असतात. हे स्वीकारून तुमच्या ध्येयावर ठाम राहायला शिका.
वयाच्या 3 व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला केली सुरुवात
भारतीय क्रिकेटपटू यश दयालने वयाच्या 3 व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तर, या प्रवासात त्याच्या वडिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. 2017-18 मध्ये त्याने पहिला व्यावसायिक सामना खेळला होता. तसेच, त्याने पुढे सांगितले की आता त्याचे लक्ष भारताच्या आगामी सामन्यांवर असणार आहे. त्यासाठी त्याची तयारीही सुरू आहे. तो कोणत्याही ट्रॉफीसाठी खेळण्यास तयार आहे.
महत्वाच्या बातम्या –
ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियन संघाने केली इतिहासाची पुनरावृत्ती; 39 वर्षांनंतर घडला ‘हा’ योगायोग
मस्तच! 5 चेंडूत 5 षटकार ठोकत अलिशान शराफूची रिंकू सिंगला टक्कर, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?