---Advertisement---

देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के! अंडर-१९ WC नंतर यश धूलसाठी आणखी एक आनंदाची बातमी

Yash-Dhull
---Advertisement---

काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धा (Icc under 19 world cup)  पार पडली होती. या स्पर्धेत भारतीय १९ वर्षाखालील संघाने अप्रतिम कामगिरी केली होती. तसेच यश धूलच्या (Yash dhull)  नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने अंतिम सामन्यात इंग्लंड संघाला पराभूत करत पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरले होते. या ऐतिहासिक कामगिरीनंतर विश्वविजेता कर्णधार यश धूलचे चहूबाजूंनी कौतुक होत आहे. दरम्यान त्याला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

भारतीय संघाला १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधार यश धूलला दिल्लीच्या (Delhi ranji team)  वरिष्ठ संघात स्थान देण्यात आले आहे. तो आगामी रणजी ट्रॉफी (Ranji trophy)  २०२२ स्पर्धेत दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे.

न्युज १८ च्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांनी म्हटले आहे की, “यश धूलने जरी रेड बॉल क्रिकेट खेळले नसेल, तरी देखील १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून त्याचा आत्मविश्वास खूप उंचावला आहे. त्यामुळे तो आता प्रथम श्रेणी क्रिकेटचा आनंद घेऊ शकतो.”

तसेच आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी प्रदीप सांगवानला दिल्ली संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. यश धूल बद्दल बोलायचं झालं तर तो १० फेब्रुवारी रोजी गुवाहाटी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर तो ५ दिवस विलगिकरणात राहणार आहे. यश धूलने उत्कृष्ठ नेतृत्वासह अप्रतिम फलंदाजी देखील केली होती. त्याने ४ सामन्यात ७६.३३ च्या सरासरीने २२९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. शतक पूर्ण करताच तो, १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावणारा विराट कोहली आणि उन्मुक्त चंद नंतर तिसरा भारतीय कर्णधार ठरला होता.

आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी असा आहे दिल्लीचा संघ :

प्रदीप सांगवान (कर्णधार) , नितीश राणा, ध्रुव शौरे, प्रियांश आर्य, यश धूल, क्षितिज शर्मा, जॉन्टी सिद्धू, हिम्मत सिंग, ललित यादव, अनुज रावत (यष्टिरक्षक), लक्ष्य थरेजा (यष्टिरक्षक), नवदीप सैनी, सिमरजीत सिंग, मयंक यादव, कुलदीप यादव , विकास मिश्रा, शिवांग वशिष्ठ आणि शिवम शर्मा.

महत्वाच्या बातम्या :

“यावेळी माझ्यावर बोली लागणार”; युवा अफगाणी फलंदाजाने व्यक्त केला विश्वास

स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत विशाल क्रिकेट क्लब, अमर इलेव्हन संघात विजेतेपदासाठी लढत

WWE सुपरस्टार ‘द ग्रेट खली’ भाजपाच्या झेंड्याखाली, दिल्लीत स्विकारले BJPचे सदस्यत्व

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---