इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहायला मिळाली. दरम्यान नुकताच संपन्न झालेल्या आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या कर्णधार यश धूलवर देखील मोठी बोली लागली आहे.
यश धूलने नुकताच संपन्न झालेल्या आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. या कामगिरीचे फळ त्याला आयपीएल २०२२ स्पर्धेच्या मेगा ऑक्शनमध्ये मिळाले आहे. या ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने ५० लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये होती.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी
यश धूलने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ठ नेतृत्वासह अप्रतिम फलंदाजी देखील केली होती. त्याने ४ सामन्यात ७६.३३ च्या सरासरीने २२९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. शतक पूर्ण करताच तो, १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावणारा विराट कोहली आणि उन्मुक्त चंद नंतर तिसरा भारतीय कर्णधार ठरला होता. आगामी हंगामात तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसून येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
‘मुंबईकर’ शिवम दुबेसाठी ‘सोनियाचा दिनू’! सकाळी बनला पिता, दुपारी करोडपती; CSK संघाकडून मोठी बोली
आयपीएलमुळे ‘या’ ४ खेळाडूंमध्ये वाढणार ‘भाईचारा’, वाद विवादामुळे आले होते चर्चेत