पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात वेस्ट इंडीजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक (icc under 19 world cup 2022) आयोजित केला जाणार आहे. १९ वर्षाखालील विश्वचषकाचा पहिला सामना १४ जानेवारीला खेळला जाईल. या आगामी स्पर्धेसाठी रविवारी (१९ डिसेंबर) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. युवा क्रिकेटपटू यश धूल (yash dhull) याला या विश्वचषक संघाचा कर्णधार बनवले गेले आहे. आपण या लेखात यशच्या इथपर्यंतच्या प्रवासाची माहिती घेणार आहोत.
तत्पूर्वी यशला यूएईत खेळल्या जाणाऱ्या १९ वर्षाखालील एशिया चषकात संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे, अशात आता विश्वचषकात देखील तो भारतीय संघाचे नेतृत्व करेल. १९ वर्षाखालील विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत आणि त्यांची चार गटांमध्ये विभागणी केली गेली आहे. भारताला त्यांचा पहिला सामना १५ जानेवारीला दक्षिण अफ्रिकाविरुद्ध खेळायचा आहे. दुसऱ्या सामन्यात संघ आयर्लंडशी भिडेल जो १९ जानेवारीला खेळला जाईल. त्यानंतर तिसरा सामना २२ जानेवारीला युगांडासोबत असेल. भारताने आतापर्यंत २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली १९ वर्षाखालील विश्वचषकाचे विजेतपद मिळवले आहे. आता यशकडे संघाला अजून एक विजेतपद मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
यशच्या इथपर्यंतच्या प्रवासात त्यांच्या कुटुंबीयाचे महत्वाचे योगदान राहिले आहे, त्यांने नेहमीच यशला समर्थन केले आणि इथपर्यंत पोहचण्यासाठी मदत केली. यशचे कुटुंब दिल्लीत असते. यशने यापूर्वी १६ वर्षाखील संघात असल्यापासून दिल्लीचे नेतृत्व केले आहे. यशच्या वडिलांना त्याच्यासाठी स्वतःची नियमित नोकरी सोडावी लागली होती, ते सध्या एका ओषध कंपनीत कार्यरत आहेत.
यशच्या क्रिकेटची सुरुवात त्याच्या घराच्या छतावरून झाली होती. तो लहान असताना त्याने घरावर क्रिकेट खेळायचा सुरुवात केली. तेथुनच त्याला क्रिकेटची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्याने क्रिकेटचा प्रवास सुरूच ठेवला. वयाच्या १२ व्या वर्षी त्याने दिल्लीच्या १४ वर्षाखालील संघात स्थान मिळवले होते. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांमध्ये देखील मुलाविषयी एकप्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. यानंतर त्यांना विश्वास वाटू लागला की, आता शिक्षणाकडे थोडे कमी लक्ष दिले तरी चालू शकते.
यशच्या वडिलांना मुलासाठी घेतलेल्या संघार्षाची माहिती स्वतः दिली होती. यशच्या वडिलांचे नाव विजय असून, त्यांनी जेव्हा नोकरी सोडली होती, तेव्हा यशच्या आजोबांच्या पेंशनवर घरखर्च भागत असल्याचे त्यांनी सांगितले होते. यशचे आजोबा भारताचे निवृत्त सैनिक आहेत. यशला खेळण्यासाठी लागणारी साधणे पुरवण्यासाठी कटुंबीयांनी त्यावेळी घरखर्च देखील कमी केला होता.
१९ वर्षाखालील विश्वचषकासाठी निवडला गेलेला भारताचा संघ –
यश धूल (कर्णधार), हरनूर सिंह, अंगक्रिश रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधु, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्य यादव (यष्टीरक्षक), राज अंगद बाव, मानव पारखी, कौशल तांबे, आरएस हँगरगेकर, वासु वत्सो, विक्की ओस्तवाल, रवी कुमार आणि गर्व सांगवान.
महत्वाच्या बातम्या –
भारीच ना! हरियाणा स्टीलर्सने बनवलं ‘या’ खेळाडूला कर्णधार, पाहा त्याची आकडेवारी