युवा फलंदाज यश धुलसाठी गेले काही महिने खूप कठीण गेले. 2022 मध्ये भारताला अंडर-19 विश्वचषक चॅम्पियन बनवणारा यश सध्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. मात्र, ही स्पर्धा त्याच्यासाठी अनेक चढ-उतारांनी भरलेली राहिली.
यशनं या हंगामाची सुरुवात सेंट्रल दिल्ली किंग्जचा कर्णधार म्हणून केली. काही सामन्यांनंतर संघानं जॉन्टी सिद्धूकडे कर्णधारपद सोपवलं. या स्पर्धेदरम्यान यशनं ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून खेळून फलंदाजीचा क्रमही बदलला. याशिवाय तो पाचव्या सामन्यात खेळला देखील नव्हता.
दरम्यान, यश धुलनं त्याच्या आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे, यशनं सांगितलं की त्याच्या हृदयात एक छिद्र आहे, ज्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये फिजिओथेरपिस्टच्या नियमित तपासणीदरम्यान यश धुलच्या हृदयात छिद्र आढळल्यानं त्याला हार्ट सर्जरी करावी लागली. धुल 2022 मध्ये आयसीसी पुरुष अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार होता. शस्त्रक्रियेनंतरही यश अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. मात्र तो त्याच्या पुनरागमनाबद्दल सकारात्मक असून मैदानावर आपलं सर्वस्व देण्यास तयार आहे.
यश धुलनं ईस्ट दिल्ली रायडर्सविरुद्धच्या सामन्यानंतर सांगितलं की, याआधी काही गोष्टी घडल्या आहेत. बरा झाल्यानंतर तो परत आला. यासाठी थोडा वेळ लागला, मात्र तो सकारात्मक आहे. मी खेळासाठी माझं 100 टक्के देईन, असं त्यानं सांगितलं. यश धुलचे बालपणीचे प्रशिक्षक प्रदीप कोचर यांनी त्याची शस्त्रक्रिया आणि डीपीएल 2024 मध्ये त्याच्या पुनरागमनाबद्दल माहिती दिली.
NCA तपासणी दरम्यान टीमनं डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर धुलला हृदयातील छिद्रासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. कोचर यांनी काही महिन्यांपूर्वी बंगळुरूमध्ये उर्वरित नवोदित खेळाडूंसोबत एका शिबिरात भाग घेतला होता. NCA नं त्याला फिटनेस सर्टिफिकेट दिलं आहे.
हेही वाचा –
बांगलादेशविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघात मोठे बदल, या दोन घातक खेळाडूंची टीममध्ये एन्ट्री
केएल राहुलला कर्णधारपदी कायम ठेवणं लखनऊसाठी ‘फायद्याचा सौदा’! कसं ते समजून घ्या
लखनऊचा मेंटॉर बनताच झहीर खानची भाषा बदलली, इम्पॅक्ट प्लेअर नियमावर केलं सडेतोड वक्तव्य