मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश संघात बेंगलोरच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर रणजी ट्रॉफी २०२१-२२ चा अंतिम सामना सुरू आहे. गुरुवारपासून (२३ जून) सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मध्य प्रदेशने सामन्यावर पकड बनवायला सुरुवात केली आहे. मुंबईने ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मध्य प्रदेशकडून शुभम शर्मा आणि यश दुबे यांनी शतके केली आहेत. त्यातही दुबेने शतक केल्यानंतर भन्नाट असे सेलिब्रेशन करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मुंबईचा संघ विक्रमी ४७ व्यांदा रणजीचा अंतिम सामना खेळत आहे. त्यांचे लक्ष ४२ वे जेतेपद जिंकण्यावर आहे. तर मध्य प्रदेशचा संघ पहिल्यांदाच विजेतेपद मिळण्यासाठी जोर लावतो आहे.
अंतिम सामन्यात (Ranji Trophy Final) प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने (Mumbai) सरफराज खानच्या शतकी खेळीच्या जोरावर ३७४ धावा केल्या होत्या. सरफराजने २ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने १३४ धावा फटकावल्या होत्या. तसेच सलामीवीर यशस्वी जयस्वालने ७८ धावांचे योगदान दिले होते. या खेळींच्या बळावर मुंबई संघाने मध्य प्रदेशपुढे ३७५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मध्य प्रदेशचा सलामीवीर यश दुबेने (Yash Dubey) खणखणीत शतक केले.
शतक (Yash Dubey Century) पूर्ण केल्यानंतर त्याने भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलप्रमाणे (KL Rahul) सेलिब्रेशन (Celebration Like KL Rahul) केले. हातातील ग्लोव्ह्ज काढून, डोक्यावरील हेल्मेट काढून त्याने कानावर बोटे ठेवत जल्लोष साजरा केला. त्याच्या याच जल्लोष साजरा करण्याच्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
That 1⃣0⃣0⃣ Feeling! 👏 👏
What a fine 💯 this has been by Yash Dubey in the @Paytm #RanjiTrophy #Final! 👍 👍 #MPvMUM
Follow the match ▶️ https://t.co/xwAZ13U3pP pic.twitter.com/3eqSSmbDfm
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 24, 2022
शुभमचाही शतकी तडाखा
यश दुबेव्यतिरिक्त शुभम शर्मानेही शतक केले. २१५ चेंडू खेळताना १ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने त्याने ११६ धावा केल्या. शुभम आणि दुबेमध्ये २०० धावांची भागीदारीही झाली. त्यांच्या या भागीदारीने मध्य प्रदेश संघाला भक्कम स्थितीत आणले आहे. मध्य प्रदेश संघाने २८० धावांचा टप्पा ओलांडला असून मुंबईचे आव्हान पूर्ण करण्याच्या नजीकही ते पोहोचले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एकाही प्रथम श्रेणीचा अनुभव नसलेल्या गोलंदाजाने उडवल्या रोहित-विराटच्या दांड्या, पण कोण आहे हा भिडू?