---Advertisement---

VIDEO : युवा फलंदाजाचं दुर्दैव…असा विचित्र रनआऊट यापूर्वी कधीच पाहिला नसेल

---Advertisement---

दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीतील सामना भारत अ आणि भारत ड यांच्यात अनंतपूरमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात सलामीवीर यश दुबे अत्यंत दुर्दैवी पद्धतीनं धावबाद झाला. त्याच्या रनआउटचा व्हिडिओ बीसीसीआय डोमेस्टिकनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यश दुबे खेळपट्टीवर पूर्णपणे सेट झाला होता. त्यानं जवळपास 100 चेंडू खेळले होते. परंतु त्याला नशीबानं साथ दिली नाही.

शम्स मुलानी भारत अ संघासाठी इंडिया डी च्या डावातील 30वं षटक टाकत होता. यश दुबेसोबत रिकी भुई क्रिजवर होता. रिकीनं षटकातील पाचव्या चेंडूवर एक शॉट खेळला. चेंडू गोलंदाजापासून बराच दूर होता. दोन्ही फलंदाजांनी धाव काढण्याचा विचार केला. मात्र, चेंडू थेट नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या यश दुबेच्या बॅटवर लागला. बॅटला चेंडू लागताच तो गोलंदाज शम्स मुलानीच्या दिशेनं गेला. तोपर्यंत यश क्रीजच्या बाहेर आला होता. संधीचा फायदा घेत मुलानीनं लगेच चेंडू उचलून विकेटवर आदळला. यश दुबेनं आपली विकेट वाचवण्यासाठी डाईव्ह मारली, परंतु तो स्वत:ला बाद होण्यापासून रोखू शकला नाही. 94 चेंडूंचा सामना करत 39 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करणारा यश 37 धावा करून बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 5 चौकार मारले.

 

सामन्याबद्दल बोलयाचं झालं तर, भारत ड संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत अ संघानं प्रथम फलंदाजी करताना शम्स मुलानी (89) आणि तनुष कोटियन (53) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 290 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारत ड संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप झाली. संघ पहिल्या डावात 183 धावांवर ऑलआऊट झाला.

दुसऱ्या डावात भारत अ संघाकडून प्रथम सिंह (122) आणि तिलक वर्मा (111) यांनी दमदार शतकं झळकावली. भारत अ संघानं 3 बाद 380 धावा करून डाव घोषित केला. भारत अ संघानं भारत ड संघाला 488 धावांचं लक्ष्य दिलं होतं. खेळाच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी उपाहारापर्यंत भारत ड संघाची धावसंख्या 4 विकेट्सवर 190 धावा आहे. त्यांना विजयासाठी 298 धावांची आवश्यकता आहे. संघाकडून रिकी भुई 85, तर संजू सॅमसन 17 धावांवर खेळत आहे.

हेही वाचा – 

जसप्रीत बुमराहकडे इतिहास रचण्याची संधी, केवळ 3 विकेट घेताच बनेल मोठा रेकॉर्ड!
10 वर्षांनंतर भारतीय संघात झहीर खानचा पर्याय! बांगलादेशविरुद्ध संधी मिळणार का?
विराट कोहली माझ्या नेतृत्वाखाली खेळला, ‘मी चांगला क्रिकेटर होतो, पण…’, बड्या नेत्याचा मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---