---Advertisement---

प्रशिक्षकाकडून कार भेट घेण्यास यशस्वी जयस्वालने दिला नकार; जाणून घ्या कारण…

On: शुक्रवार, फेब्रुवारी 14, 2020 7:07 PM
---Advertisement---

रविवारी (9 फेब्रुवारी) सेनवेस पार्क (Senwes Park), पोटचेफस्ट्रूम (Potchefstroom) येथे 19 वर्षाखालील विश्वचषकातील (Under-19 World Cup) अंतिम सामन्यात (Final Match) 19 वर्षांखालील बांगलादेश संघाने 19 वर्षांखालील भारतीय संघाला पराभूत केले.

या स्पर्धेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. परंतु अंतिम सामन्यात मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या पराभवामुळे या भारतीय संघाचा फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) निराश झाला आहे.

यशस्वीने या अंतिम सामन्यात 121 चेंडूत सर्वाधिक 88 धावांची खेळी केली होती. यामध्ये 1 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. तसेच त्याने या संपूर्ण स्पर्धेत त्याच्या कामगिरीने सर्वांची वाहवा मिळवली होती. यशस्वीने या स्पर्धेत 6 सामन्यात मिळून (59, 29*, 57*, 62, 105* आणि 88) 400 धावांचे योगदान दिले. यादरम्यान त्याने 5 वेळा 50हून अधिक धावा केल्या. तसेच त्याने गोलंदाजी करताना 3 विकेट्सही घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतल्यानंतर यशस्वीचे प्रशिक्षक ज्वाला सिंग (Jwala Singh) यांनी त्याला त्याच्या शानदार कामगिरीबद्दल एक कार भेट देण्याची ऑफर दिली होती. परंतु यशस्वीने ती भेट स्विकारण्यास नम्रपणे नकार दिला.

यशस्वीने प्रशिक्षक सिंग यांना विनंती केली आहे की, भेट म्हणून तु्म्ही तुमची जुनी कार द्या आणि तु्म्ही स्वत:साठी एक नवीन कार घ्या.

प्रशिक्षक सिंग यांनी यशस्वीला नवीन कार भेट (Car Gift) म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना माहिती होते की, सराव करण्यासाठी यशस्वीला जास्त वजन असलेली किट बॅग घेऊन मैदानावर जाण्यासाठी खूप त्रास होत होता. हा त्रास दूर करण्यासाठी त्यांनी यशस्वीसाठी कार विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यशस्वीने वयाची 18 वर्षे पूर्ण केली नव्हती.

मागील वर्षी 28 डिसेंबरला यशस्वीने वयाची 18 वर्षे पूर्ण केली. त्यानंतर सिंग यांनी विचार केला की, आता यशस्वीचा ड्रायव्हिंग लायसन्सचा परवाना बनविला जाऊ शकेल. त्यामुळे कार भेट देण्याची ही योग्य वेळ आहे. परंतु तेव्हा तो 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या तयारीमध्ये व्यस्त होता.

“जेव्हा यशस्वी दक्षिण आफ्रिकेला रवाना होत होता तेव्हा मी त्याला सांगितले होते की, विश्वचषकात जर तू सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला तर मी तुला कार भेट म्हणून देईल,” असे प्रशिक्षक सिंग यावेळी म्हणाले.

यशस्वीने प्रशिक्षक सिंग यांनी दिलेले वचन पूर्ण करून दाखविले आणि तो यावर्षीच्या 19 वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

आम्ही पूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. परंतु विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमचा पराभव झाला. याचे मला खूप वाईट वाटत आहे. आता 19 वर्षाखालील क्रिकेट खेळण्याचे दिवस गेले आहेत. आता सिनियर लेव्हलवर खेळण्यासाठी स्वत:ला तयार करावे लागेल, असे यशस्वी म्हणाला.

सध्या यशस्वी त्याच्या 19 वर्षांखालील विश्वचषकातील शानदार कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याची अनेकांनी प्रशंसा केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---