---Advertisement---

पाणीपुरी विकून जीवन जगणाऱ्या पठ्ठ्याचे आता बदलणार आयुष्य; गुरुमंत्र घेऊन ठेवतोय आयपीएलमध्ये पाऊल

---Advertisement---

२०१९ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषकात यशस्वी जयस्वालने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत त्याने ६ सामन्यात ४०० धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने १ शतक व ४ अर्धशतके झळकावली होती.

यशस्वीच्या या कामगिरीकडे पाहता २०२० च्या आयपीएलच्या लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने मूळ किंंमतीपेक्षा १२ पट अधिक किंमतीने आपल्या संघात सामील केले आहे.

जयस्वालबद्दल बोलताना त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंग म्हणाले, मी त्याला सांगितले की हा एक नवीन प्रवास आहे आणि त्याला स्वत:ला सिद्ध करावे लागेल.

जयस्वाल आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. याआधी त्याला बालपणीचे प्रशिक्षक ज्वाला सिंगकडून गुरु मंत्र मिळाला आहे. ज्वाला यांनी त्याला शून्यापासून सुरुवात करण्याचा सल्ला दिला आहे.

जयस्वालच्या प्रशिक्षकाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “बुधवारी रात्री आमची खूप चर्चा झाली. तो युवा आहे आणि तो प्रथमच आयपीएल खेळणार आहे. मी त्याच्या क्षमतेवर नेहमीच विश्वास ठेवला आहे. त्याने मला सांगितले की तो स्वत: ला मानसिकरीत्या शांत आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आयसोलेशनमध्ये योगाचा अवलंब करीत आहे.”

जयस्वालने स्वत: ला सिद्ध केले पाहिजे: प्रशिक्षक

ते पुढे म्हणाले की, “मी त्याला सांगितले आहे की हा एक नवीन प्रवास आहे आणि त्याने सर्वांसमोर स्वत: ला सिद्ध केले पाहिजे. त्याच्यासाठी क्रिकेटची दीर्घ प्रतीक्षा संपुष्टात येत आहे. मी त्याला सांगितले की तू मागील ६-७ महिन्यांपासून क्रिकेट खेळला नाही. तुला क्रिकेट माहीत आहे. पण आयपीएलपूर्वी तुला आत्मविश्वास परत मिळवावा लागेल. तू जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना भेटणार आहेस आणि त्यांच्याकडून तुला शिकले पाहिजे.”

जयस्वाल पाणीपुरी विकून जीवन जगत असे

एकेकाळी पाणीपुरी विकून त्यामध्ये जीवन जगणारा जयस्वाल दक्षिण आफ्रिकेत यावर्षी झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात मालिकावीर ठरला होता.  पण अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव केला.

राजस्थानने बेस किमतीपेक्षा १२ पट किंमत देऊन त्याला विकत घेतले

१९ वर्षांखालील विश्वचषक आणि घरगुती क्रिकेटमधील कामगिरी लक्षात घेता राजस्थान रॉयल्सने त्याला आयपीएलच्या लिलावात २० लाखांच्या मूळ किंमतीपेक्षा १२ पट अधिक किंमत देऊन संघात घेतले आहे. यशस्वीने आतापर्यंत १ प्रथम श्रेणी आणि १३ अ दर्जाचे सामने खेळले आहेत. यात त्याने प्रथम श्रेणीत एकूण २० धावा केल्या आहेत, तर  दर्जाच्या सामनात त्याने ७०.८१ च्या सरासरीने ७७९ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-इंग्लंडसाठी वाईट बातमी; पाकिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी हा स्टार खेळाडू झाला जखमी 

-‘या’ महिन्यापासून रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात करा; रणजी क्रिकेटमधील बॉसची मागणी

-ज्या गोष्टींसाठी विराटने घेतली मेहनत, आता म्हणतोय त्याच गोष्टी नाही ठेवणार घरात

ट्रेंडिंग लेख-

-विराट यंदा सनराइजर्स हैद्रबादकडून शानदार कामगिरी करण्यास सज्ज; तर ‘या’ ४ खेळाडूंवरही असेल सर्वांचे लक्ष

-एमएस धोनीचे आयपीएलमधील ३ शानदार विक्रम, ज्यांच्या आसपासही नाही कुणी

-वाढदिवस विशेष- लसिथ मलिंगाबद्दल माहित नसलेल्या १० खास गोष्टी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---