भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने आशिया चषकाच्या 15व्या हंगामात शतक केले. तर आणखी एका भारताच्या युवा खेळाडूने शतक केले आहे. सध्या भारतात प्रथम श्रेणी क्रिकेटचे सामने सुरू आहे. दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) 2022च्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. त्यातील पहिला सामना वेस्ट झोन विरुद्ध नॉर्थईस्ट झोन यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा सामना संपला असता यशस्वी जयसवाल आणि कर्णधार अंजिक्य रहाणे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
युवा फलंदाज यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याच्यासाठी 2022 वर्ष उत्तम ठरत आहे. वेस्टझोनकडून खेळताना त्याने प्रथम श्रेणातील पहिले द्विशतक केले आहे. त्याने 281 चेंडूत हे द्विशतक पूर्ण केले आहे. डाव्या हाताचा हा फलंदाज 228 धावा करत बाद झाला. त्याने 22 चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. त्याने पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सोबत पहिल्या विकेटसाठी 206 धावांची भागीदारी रचली, तर दुसऱ्या विकेटसाठी अंजिक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्यासोबत 333 धावांची भागीदारी केली. सलामीवीर पृथ्वी शॉ 113 धावा करत बाद झाला.
यशस्वीने आतापर्यंत प्रथम श्रेणीच्या 9 डावांमध्ये एक द्विशतक, तीन शतक आणि एक अर्धशतक केले आहे. त्याचबरोबर त्याने रणजी ट्रॉफी 2022च्या उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीच्या दोन्ही डावांत शतकी खेळी केली होती. तसेच अंतिम सामन्यातही अर्धशतक केले होते. त्याची स्थानिक क्रिकेटमधील धावा काढण्याचे सातत्य अप्रतिम आहे. त्याची प्रथम श्रेणीतील सर्वोच्च वैयक्तिक धावासंख्या 181 होती. ही खेळी त्याने मुंबईकडून खेळताना मध्य प्रदेश विरुद्ध केली होती.
या सामन्यात रहाणेही चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. त्यानेही द्विशतक केले आहे. सध्या तो 264 चेंडूत 207 धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO | हे काय? पाकिस्तानी चाहत्यांची कुटाई केली, पण भारतीयांच्या गळ्यात पडून सामना पाहत होते अफगाणी चाहते
Video: अभी है क्रिकेट बाकी! 71वे शतक ठोकल्यानंतर विराट-भुवीचे संभाषण झाले व्हायरल
विराटने शतक करताच गौतम गंभीरचा यू-टर्न! म्हणाला, ‘तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमारने…’