यशस्वी जयस्वाल इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना सध्या खेळत आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याने संघासाठी महत्वपूर्ण धावांचे योगदान दिले. सलग दोन कसोटी सामन्यात त्याने द्विशतक देखील झळकावले आहे. रांची कसोटी सुरू असताना जयस्वालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) भारतीय क्रिकेट संघाचा उगवता तारा आहे. इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टन याठिकाणी भारताने कसोटी मालिकेतली दुसरा, तर राजकोटमध्ये तिसरा सामना खेळला. या दोन्ही सामन्यात जयस्वालने अनुक्रमे 209 आणि 2014* धावांची खेळी केली. आता रांची कसोटी सामन्यात देखील त्याच्याकडून संघाला चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. रांची कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघ अपेक्षित सुरुवात करू शकला नाही. पण जो रुट (Joe Root) याच्या शतकामुळे इंग्लंडचा डाव सावरला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने रांची कसोटीच्या पहिल्या डावात 353 धावा केल्या. रुटने नाबात 122 धावांची खेळी केली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत स्टॅन्डमधील एक चाहती जयस्वालशी बोलत आहे. जयस्वाल ड्रेसिंग रुमच्या बाहेर उभा आहे. अशातच ही चाहती जयस्वालला आवाज देते. जयस्वालच्या शेवजी जो खेळाडू आहे, त्याला ही चाहती पाहू इच्छित आहे. पण हा खेळाडू तिला दिसत नाहीये. अशात या चाहतीने त्या खेळाडूला इकडे पाहायला सांग, अशी विनंती जयस्वालकडे केली. पण जयस्वाल यावर म्हणाला की, “मी देखील त्याला घाबरतो.” असे असले तरी, जयस्वालशेजारचा हा खेळाडू नक्की होण आहे, हे शेवटपर्यंत समजले नाहीये. अनेकजण अशा अंदाज बांधत आहेत की, जयस्वालला भीती वाटणारा दुसरा कोणी नसून रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे.
Yashasvi Jaiswal : Mujhko bhi daar lagta hai unse(Rohit Sharma) ~ while talking with a Fan Girl 😂🤣#RohitSharma | #INDvsENGpic.twitter.com/zI5pKXLsAX
— ARYAN_OP™ (@ARYAN__OP) February 23, 2024
(Yashasvi Jaiswal : Mujhko bhi daar lagta hai unse(Rohit Sharma) ~ while talking with a Fan Girl)
रांची कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन
भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप (पदार्पण), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या –
WPL 2024 । रोमांचक सामन्यात दिल्ली शेवटच्या चेंडूवर पराभूत! सजीवन सजना कधीच नाही विसरणार असे पदार्पण
मोठी बातमी! भारतीय क्रिकेटपटूचे सामन्यानंतर निधन, ह्रदय विकाराच्या झटक्याने झाला मृत्यू