---Advertisement---

२०१९मधील सुपरस्टार क्रिकेटर यशस्वी जयस्वालला मिळाले दिवाळी गिफ्ट, या मोठ्या संघात निवड

---Advertisement---

मुंबई । गुरूवारपासून (31 ऑक्टोबर) देवधर ट्रॉफी स्पर्धा सुरू होणार आहे. यामध्ये मुंबईचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वालला देवधर ट्रॉफीतील तीन संघांपैकी इंडिया ‘बी’ संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने नुकत्याच झालेल्या विजय हजारे वनडे ट्रॉफीमध्ये उत्तम कामगिरी केली होती.

विजय हजारे वनडे ट्रॉफीमध्ये खेळताना त्याने झारखंड विरुद्ध द्विशतक केले होते. त्याचबरोबर तो या स्पर्धेत मुंबईचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 6 सामन्यांमध्ये 3 शतकांच्या मदतीने 564 धावा केल्या होत्या.

तसेच देवधर ट्रॉफी स्पर्धेत यशस्वी खेळणार असणाऱ्या इंडिया ‘बी’ संघाचे कर्णधारपद पार्थिव पटेलकडे देण्यात आले आहे. तर हनुमा विहारीला इंडिया ‘अ’ संघाचे कर्णधार केेले आहे आणि युवा क्रिकेटपटू शुबमन गिलकडे इंडिया ‘सी’ संघाचे कर्णधारपद सोपवले आहे.

मागील अनेक दिवसांपासून पार्थिव आणि अश्विन मर्यादीत षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत.

अश्विनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडू संघाकडून फक्त एकच सामना खेळला आहे. त्यात त्याने 8 षटकांमध्ये 21 धावा देऊन 1 विकेट घेतली.

34 वर्षीय दिनेश कार्तिकची निवडीदेखील अनेकांना आश्चर्य वाटले आहे. कारण, विश्वचषकानंतर त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. परंतु, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना मागील 11 सामन्यात 67.83 च्या सरासरीने 4 अर्धशतकांसह 407 धावा केल्या.

मुंबईमध्ये काल(24 ऑक्टोबर) वरिष्ठ निवड समितीच्या झालेल्या बैठकीत देवधर ट्रॉफीसाठी या संघांची निवड करण्यात आली आहे.

आयपीएलमध्येही मिळू शकते जयस्वालला संधी –

इंडिया ‘बी’ संघात निवड झालेला जयस्वाल हा आयपीएलमधील अनेक संघांच्या रडारवर असणार आहे. आयपीएलचा लिलाव डिसेंबरच्या 19 तारखेला कोलकातामध्ये होणार असून जयस्वाल चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

या आठवड्यात बुधवारी मुंबई इंडियन्स घणसोली येथे 19 वर्षाखालील फलंदाजांना चाचणी घेण्यासाठी  बोलावणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---