---Advertisement---

काय सांगता! एका चेंडूत 13 धावा ठोकल्या…!! टी20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं

---Advertisement---

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना हरारे येथे सुरू आहे. या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार कर्णधार सिकंदर रझानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीसमोर स्वतः कर्णधार रझानं पहिलं षटक टाकण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्याचा हा निर्णय झिम्बाब्वे संघाला महागात पडल्याचं वाटत होतं, मात्र अखेरीस त्यानं आपला निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं. डावखुरा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं पहिल्या षटकाच्या सुरुवातीला रझाला सलग दोन षटकार ठोकले. मात्र चौथ्या चेंडूवर सिकंदर रझानं त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

वास्तविक, सिकंदर रझानं भारताच्या डावातील पहिलं षटक टाकलं. पहिल्याच चेंडूवर यशस्वीनं जोरदार षटकार हाणला, मात्र हा चेंडू ‘नो बॉल’ होता. त्यामुळे एकही चेंडू न खेळता भारताला 7 धावा मिळाल्या. पुढच्या फ्री हिट बॉलवर यशस्वीनं पुन्हा षटकार मारला, पण हा चेंडू वैध होता. अशाप्रकारे फक्त 1 कायदेशीर चेंडू खेळून यशस्वीनं 2 षटकार ठोकले आणि टीम इंडियानं धावफलकावर 13 धावा लगावल्या. यानंतर सिकंदर रझानं 2 डॉट बॉल्स टाकल्यानंतर यशस्वी जयस्वालला बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

 

सामन्याच्या पहिल्या वैध चेंडूवर एखाद्या संघानं 10 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी हा पराक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर होता. श्रीलंकेच्या दिलशान मधुशंकानं एका चेंडूत 10 धावा दिल्या होत्या. तर न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानी गोलंदाजानं 1 चेंडूवर 9 धावा दिल्या आहे.

यशस्वी जयस्वाल हा भारताच्या टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. त्यामुळे तो झिम्बाब्वेविरुद्धचे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. परंतु त्यानं शेवटच्या 3 सामन्यात भाग घेतला, ज्यात त्यानं एकूण 141 धावा केल्या. यामध्ये नाबाद 93 धावांच्या सर्वोत्कृष्ट खेळीचा समावेश आहे. याशिवाय आपल्या पहिल्या सामन्यात त्यानं 36 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

इतिहासातील सर्वात महागडा अंतिम सामना…12 लाखाचं एक तिकीट! सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत जाणून बसेल धक्का
नाईलाजास्तव खेळायला सुरुवात केली…आज बनला जगातील सर्वात प्रसिद्ध भालाफेकपटू! मजेदार आहे नीरज चोप्राची कहानी
बार्बोरा क्रेजिकोव्हा बनली विम्बल्डनची नवीन चॅम्पियन….इटलीची खेळाडू इतिहास रचण्यापासून चुकली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---