India vs Afghanistan 2nd T20I: रविवारी (14 जानेवारी) इंदोरच्या होळकर स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दुसरा टी-20 सामना झाला. हा सामना 6 विकेट्स राखून जिंकून भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने महत्त्वाची भूमिका बजावली. जयस्वालने अवघ्या 34 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी केली. सामन्यानंतर या युवा सलामीवीराने अनेक मोठे खुलासे केले आहेत.
सलामीवीर यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal) याने भारतीय फलंदाजी क्रमातील आपल्या भूमिकेबद्दल सांगितले की, अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात संघाला चांगल्या स्ट्राईक रेटने चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न करत होता. जयस्वालने 34 चेंडूत 68 धावांची खेळी खेळली तर शिवम दुबे 32 चेंडूत 63 धावा करून नाबाद राहिला, ज्यामुळे भारताने सहा विकेट्स राखून विजय मिळवला.
सामन्यानंतर यशस्वी जयस्वाल म्हणाला, “मला माझा नैसर्गिक खेळ खेळण्यास सांगण्यात आले होते आणि मी तसा प्रयत्न करत होतो. मी स्लो चेंडू मारण्याचा प्रयत्न करत होतो. माझे लक्ष संघाला चांगली सुरुवात देण्यावर होते. तेच मी केले. त्यामुळे मी बराच वेळ फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. मी माझा स्ट्राइक रेट चांगला ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मी चांगल्या स्ट्राईक रेटवर धावा करण्यावर लक्ष केंद्रित करत होतो.”
22 वर्षीय यशस्वी जयस्वाल पुढे म्हणाला की, जेव्हा-जेव्हा मला संधी मिळते तेव्हा संघासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करतो. मी सराव सत्रांदरम्यान कठोर परिश्रम करतो. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. संघासाठी माझे सर्वोत्तम योगदान दिले पाहिजे असे मला वाटते.”
जयस्वाल विचारण्यात आले की, त्याने क्रीजवर वरिष्ठ फलंदाज विराट कोहलीशी काय संभाषण केले. याला उत्तर देताना तो म्हणाला, “जेव्हाही मी विराट भैय्यासोबत फलंदाजी करतो, तेव्हा ती माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असते. मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळते. यावेळी आम्ही कुठे शॉट्स मारले पाहिजेत यावर चर्चा केली.”
रोहित शर्मा याच्याबद्दल जयस्वाल म्हणाला, “तो म्हणतो की, तू जा आणि धैर्याने खेळ खेळ. तो नेहमी म्हणतो की, तू तुझे शॉट्स खेळ. तो आमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतो. जर तुमच्याकडे असा वरिष्ठ खेळाडू असेल तर ते खूप चांगले आहे. आता मला अधिक कष्ट करावे लागतील.” (Yashasvi Jaiswal told the secret of success Said Whenever I Virat)
हेही वाचा
IND vs AFG : अफगाणिस्तानविरूद्धच्या विजयानंतर रोहितचं लक्षवेधी विधान; म्हणाला, ‘अशी कामगिरी पाहून…’
ईशान किशनलाबद्दल थेट सीमेपलीकडून आली प्रतिक्रिया, पाकिस्तानी माजी दिग्गजाने केले मोठे विधान