इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंग या युवा खेळाडूंना संधी मिळण्याची अपेक्षा आहे. अर्शदीप सिंग सध्या टीम इंडियाच्या टी20 संघाचा भाग आहे. पण त्याला देखील एकदिवसीय मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडमालिकेपूर्वी ऑफ-स्पिनर म्हणून वॉशिंग्टन सुंदरचे नाव पुढे आले आहे, तर यशस्वी जयस्वाल फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बॅकअप ओपनर म्हणून खेळेल.
सलामीवीर यशस्वी जयस्वाल, फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी निवड होऊ शकते. जर या खेळाडूंना या मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आणि त्यांनी चांगली कामगिरी केली तर त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम इलेव्हनमध्येही स्थान मिळू शकते. याशिवाय अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे नावही आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार शमी लवकरच बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळू शकते.
View this post on Instagram
अलिकडेच शमी बंगालकडून रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे स्पर्धा खेळला. त्याने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2023 विश्वचषकामध्ये खेळला होता. याशिवाय, युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला एकदिवसीय संघात स्थान मिळणार नाही तर तो इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळू शकतो. असे वृत्त समोर आले आहे. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारी, दुसरा सामना 9 फेब्रुवारी आणि तिसरा सामना 12 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.
हेही वाचा-
काय सांगता! कॅच पकडल्यानंतर चाहत्याला 90 लाख रुपयांचे बक्षिस, या स्पर्धेसमोर आयपीएलही फेल!
रोहित शर्मा नाही तर हा खेळाडू सर्वोत्तम कर्णधार, माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
कसोटीत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम, खेळाडू ते प्रशिक्षक असा होता ‘राहुल द्रविड’चा अद्भुत प्रवास