यशस्वी जयस्वाल याने शनिवारी (17 फेब्रुवारी) आपला फॉर्म कायम ठेवत शतक ठोकले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. शनिवारी जयस्वालने या सामन्यातील आपल्या दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. अवघ्या 122 चेंडूत सलामीवीर फलंदाजने ही कामगिरी केली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक आहे.
यशस्वी जयस्वाल याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कारकिर्दीतील पहिले द्विशतक केले होते. अशातच शनिवारी तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या बॅटमधून शतक आले. युवा सलामीवीर फलंदाजासाठी हे सलग दोन सामने नक्कीच आत्मविश्वास वाढवणारे ठरू शकतात. त्याने 133 चेंडूत 104 धावांची खेळी केल्यानंतर रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. लाईव्ह सामन्यात त्याच्या पाठीत वेदना होऊ लागल्यामुळे सलामीवीर फलंदाजाने हा निर्णय घेतला.
राजकोट कसोटी गुरुवारी (15 फेब्रुवारी) सुरू झाली. गुरुवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्यांदा फलंदाजीला आला. रोहित शर्मा अवघ्या 19 धावा करून तंबूत परतला. पण कर्णधाराच्या जोडीने डावाची सुरुवात करायला आलेला यशस्वी जयस्वाल खेळपट्टीवर टिकला. त्याने 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक 122 चेंडूत साकारले. उभय संघांतील राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात मात्र जयस्वाल वैयक्तिक 10 धावा करून तंबूत परतला होता. तत्पूर्वी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जयस्वालने 17 आणि 209 धावांची खेळी केली होती.
Yashasvi Jaiswal was 35*(73) then:
6, 4, 4, 0, 0, 0, 6, 6, 0, 0, 0, 4, 0, 1, 6, 0, 1, 6, 0, 0, 0, 1, 0, 0, 4, 0, 4, 0, 0, 0, 1, 1, 0, 0, 0, 1, 1, 0, 0, 0, 0, 2, 0, 0, 0, 0, 1, 1, 4 and completed hundred. 🔥 pic.twitter.com/pfGz8SVffO
— Johns. (@CricCrazyJohns) February 17, 2024
दरम्यान, उभय संघांतील या राजकोट कसोटीचा विचार केला, तर पहिल्या डावात भारताने 445, तर इंग्लंडने 319 धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय संघाची धावसंख्या 30 असताना रोहित शर्मा बाद झाला. पण त्यानंतर जयस्वाल आणि शुबमन गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी पार पडली.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
(Yashasvi Jaiswal;s century in the Rajkot Test)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
मोहम्मद हाफीजची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धमकी, म्हणाला ‘मी सर्वांना उघडे पाडेन…
रणजी ट्रॉफी खेळली नाही तर भोगावे लागतील वाईट परिणाम, BCCI चा खेळाडूंना थेट इशारा